|Friday, October 19, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » भारतीय शास्त्रज्ञांकडून ‘सरस्वती’ या महादीर्घिका समूहांचा शोध

भारतीय शास्त्रज्ञांकडून ‘सरस्वती’ या महादीर्घिका समूहांचा शोध 

पुणे / प्रतिनिधी :

रात्रीच्या आकाशात दिसणाऱया लाखो ताऱयांच्या धूसर पट्टयाला पुरातन काळापासून ‘आकाशगंगा’ म्हटले जाते. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱया दीर्घिकांचा (गॅलेग्झी) अतिशय घन असा महासमूह (सुपरक्लस्टर) शोधला असून, त्याचे नामकरण ‘सरस्वती’ असे केले आहे.

पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी ऍड ऍस्ट्रोफिजिक्सच्या (आयुका) च्या पुढाकाराने केल्या गेलेल्या या संशोधनात पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्यूकेशन ऍड रिसर्च (आयसर) एनआयटी-जमशेदपूर आणि केरळच्या थोडुपुळा येथील न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. स्लोन डिजीटल स्काय सर्व्हे (एसडीएसएस) संशोधन करण्यात आले.

मीन राशीत सापडलेल्या ‘सरस्वती’ या महासमूहात हजारो दीर्घिकांचा सहभाग असणारे 43 समूह असून, त्यांचे एकत्रित वस्तूमान दोन कोटी अब्ज सूर्याइतके असावे, असा अंदाज आहे. दीर्घिकांच्या या महासमूहाची व्याप्ती 60 कोटी प्रकाशवशर्षे इतकी आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर दहा अब्ज वर्षांनी ‘सरस्वती’ समूहाची असणारी अवस्था सध्या आपल्यात दिसत आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या शोधामुळे विश्वरचनाशास्त्रातील जुन्या संकल्पनांचा खगोलशास्त्रज्ञांना फेरविचार करावा लागणार आहे. प्रख्यात ऍस्ट्रोलॉजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, आयुकाच्या प्रा. जॉयदीप बागची यांच्यासह प्रकाश सरकार, शिशिर सांख्यायन, प्रा. सोमक रायचौधरी, जो जेकब आणि प्रतिक दाभाडे यांचा या संशोधनात सहभाग आहे.

‘सरस्वती’ नामकरण कशामुळे?

‘सरस्वती’ ही विद्या, कला, संगीत आणि निसर्गाची प्राचीन देवता असून, ऋग्वेदात सरस्वती या नदीचा उल्लेख झाला आहे. अनेक प्रवाह एकत्र येऊन सतत प्रवाहीत असणाऱया या नदीकाठी वेदांची रचना झाली, असे मानले जाते. या महासमूहाच्या दीर्घिकांचे अनेक समूह एकत्र येऊन तयार झाला असल्यामुळे त्याचे नामकरण ‘सरस्वती’ करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी शोध निबंधात म्हटले आहे.

 

Related posts: