|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चोहीकडे पर्यटकच पर्यटक

चोहीकडे पर्यटकच पर्यटक 

आंबोली : आंबोलीत रविवारी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. पर्यटकांच्या तुफान गर्दीमुळे मुख्य धबधब्याजवळ पारपोली ग्रामपंचायतीने उभारलेले तिकीट केंद्र गुंडाळावे लागले. त्यामुळे पर्यटकांनी विनाशुल्क आनंद लुटला. अखेरचे दोन रविवार असल्याने सुमारे दीडशे पालिसांचा बंदाबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनांची कोंडी टळली. हजारो पर्यटक आल्याने बाजारपेठ ते मुख्य धबधब्यापर्यंत वाहने धिम्यागतीने जात होती. रविवारी सर्वाधिक पर्यटक बेळगाव, कर्नाटकमधील होते. कर्नाटक आगाराच्या बसमधूनही पर्यटक दाखल झाले होते.

मुख्य धबधब्याच्या ठिकाणी हजारो पर्यटक धबधब्याखाली जाण्यासाठी प्रतीक्षेत होते. पोलीस ठराविक पर्यटकांनाच काही अंतराने सोडत होते. त्यासाठी काठीचे गेट करण्यात आले होते. त्यामुळे तेथे जाण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.

गत दोन रविवारी पर्यटकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. रविवारीही आंबोलीत मोठय़ा संख्येने हजेरी लावणार हे अपेक्षित होते. मात्र, अपेक्षेपेक्षा अधिक पर्यटक दाखल झाले. सर्वत्र पर्यटकच दिसत होते. घाटात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी बहुसंख्य वाहने आंबोलीत थांबवून ठेवली होती. त्यामुळे आंबोली बाजारपेठ ते मुख्य धबधब्यापर्यंत पायी यावे लागत होते. घाटरस्त्यात पर्यटकांच्या रांगाच लागल्या होत्या. मुख्य धबधब्यावरही पर्यटकांची गर्दी उसळली होती. गर्दीमुळे गोंधळ उडू नये, यासाठी तिकीट केंद्र दुपारी बंद करण्यात आले. पर्यटक मुख्य धबधब्यासह कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, सनसेट पॉईट येथेही आनंद लुटतांना दिसत होते.

गेल्या दोन रविवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा अनुभव लक्षात घेऊन सुमारे 150 पोलीस आंबोलीत तैनात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस स्वतः लक्ष ठेवून होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहिली. पोलिसांच्या नियोजनाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी कौतुक केले.

बेळगाव, कर्नाटकच्या पर्यटकांची गर्दी

सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरसह बेळगाव, कर्नाटक येथील पर्यटकांनी रविवारी हजेरी लावली. बेळगाव, कर्नाटकमधील पर्यटक जास्त होते. कर्नाटक पासिंगच्या गाडय़ा मोठय़ा संख्येने होत्या. तसेच खासगी बसमधूनही पर्यटक आले होते.

Related posts: