|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अमित कोरे यांचा सत्कार

अमित कोरे यांचा सत्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

पांगुळ गल्ली येथील जैन मंदिरात सध्या आचार्य देवेंद्र सागर सुरीश्वरजी महाराजांची प्रवचनमाला सुरू आहे. त्याला भक्तगणांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

या प्रवचनमालेप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी अमित कोरे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी मंदिराच्या पदाधिकाऱयांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मंदिरचे आचार्य देवेंद्र सागर सुरीश्वरजी महाराज यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच त्यांनी महाराजांकडून प्रेरणा मिळविली. यावेळी महाराजांच्या हस्ते अमित कोरे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी त्यांना पद्मावती देवीची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.