|Sunday, June 17, 2018
You are here: Home » उद्योग » निफ्टी पहिल्यांदाच 9,900 पल्याड

निफ्टी पहिल्यांदाच 9,900 पल्याड 

बीएसईचा सेन्सेक्स 54, एनएसईचा निफ्टी 30 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगले संकेत आणि लिक्विडिटीमुळे भांडवली बाजार नवीन विक्रमावर पोहोचले. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाले. निफ्टी पहिल्यांदाच 9,900 च्यावर बंद होण्यास यशस्वी ठरला, तर बँक निफ्टी पहिल्यांदाच 24 हजारावर पोहोचला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9928 आणि सेन्सेक्सने 32,121 ही उच्चांक गाठला होता.

बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 54 अंशाने वधारत 32,075 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 30 अंशाने मजबूत होत 9,916 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी मजबूत होत 24,015 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात मात्र तेजी दिसून आली नाही. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक घसरत बंद झाला, तर निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वधारला.        बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक घसरत बंद झाला.

आयटी, धातू, वाहन, औषध, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात खरेदी झाली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.1 टक्के, धातू निर्देशांक 1 टक्के, वाहन निर्देशांक 0.4 टक्के आणि औषध निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाले. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.3 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक तसेच ऊर्जा निर्देशांक 0.3 टक्क्यांनी मजबूत झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

अल्ट्राटेक सिमेंट, वेदान्ता, विप्रो, एचसीएल टेग, झी एन्टरटेनमेन्ट, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, सिप्ला आणि इन्फोसिस 3-1.4 टक्क्यांनी वधारले. आयटीसी, कोल इंडिया, येस बँक, गेल, ऍक्सिस बँक, डॉ. रेड्डीज लॅब आणि मारुती सुझुकी 3.6-0.4 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात जिंदाल स्टील, अशोक लेलँड, एसजेव्हीएन, भारत फोर्ज आणि बायोकॉन 3.2-2 टक्क्यांनी वधारले. एचपीसीएल, श्रीराम ट्रान्स्पोर्ट, व्हॅवेल्स इंडिया, एमआरपीएल आणि एम्फेसिस 2.7-25 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात भन्साली इंजीनियरिंग, श्रेई इन्फ्रा, ज्युबिलंट फूड, जयप्रकाश असोसिएट्स आणि डीसीडब्ल्यू 12-6.8 टक्क्यांनी मजबूत झाले. फ्लेक्सिटफ इन्टरनॅशनल, फोर्टिस हेल्थ, सुप्रीम इन्फ्रा, वेंकीज आणि युनिफाय इन्डस्ट्रीज 20-6.2 टक्क्यांनी घसरले.

Related posts: