|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » उद्योग » मंगळवारच्या घसरणीनंतर बाजार सावरला

मंगळवारच्या घसरणीनंतर बाजार सावरला 

बीएसईचा सेन्सेक्स 244, एनएसईचा निफ्टी 72 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी बाजारात घसरण झाल्यानंतर दुसऱया सत्रात चांगली तेजी दिसून आली. निफ्टी 9,900 आणि सेन्सेक्स 32,000 च्या पार पोहोचण्यास मदत झाली. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9905 आणि सेन्सेक्स 31,979 पर्यंत पोहोचला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 244 अंशाने वधारत 31,955 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 72 अंशाच्या मजबुतीने 9,899 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 24,153 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली तेजी आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला.

औषध, धातू, स्थावर मालमत्ता, एफएमसीजी, आयटी, वाहन, बँकिंग, ऊर्जा, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 2.1 टक्के, धातू निर्देशांक 2 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.5 टक्के, आयटी निर्देशांक 0.9 टक्के आणि आयटी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.5 टक्के, ऊर्जा निर्देशांक 1 टक्के, भांडवली वस्तू 0.6 टक्के आणि तेल आणि वायू समभागात 1 टक्क्यांची मजबूती आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

अरबिंदो फार्मा, भारती एअरटेल, हिंडाल्को, झी एन्टरटेनमेन्ट, कोल इंडिया, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब आणि टीसीएस 4.3-1.9 टक्क्यांनी वधारत बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी, भारती इन्फ्राटेल, अंबुजा सिमेंट, इन्फोसिस, हीरो मोटो, हिंदुस्थान युनि, अदानी पोर्ट्स आणि एचडीएफसी 2.9-0.2 टक्क्यांनी घसरले. मंगळवारी आयटीसीचा समभाग 15 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता. बुधवारी समभागात चांगली खरेदी झाली. समभाग खालच्या पातळीवर पोहोचल्यावर गुंतवणूकदारांनी खरेदी करण्यास प्राधान्य दिले. 

मिडकॅप समभागात एमआरपीएल, रिलायन्स कम्युनिकेशन्स, इंडियन बँक, एचपीसीएल आणि नाल्को 6.3-3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात मास्टेक, टिनप्लेट, प्रकाश इन्डस्ट्रीज, जिंदाल स्टेनलेस आणि फ्लेक्सिटफ इन्टरनॅशनल 20-9.75 टक्क्यांनी वधारले.

Related posts: