|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हडलगे, तावरेवाडी बंधारे दुसऱया दिवशीही पाण्याखाली

हडलगे, तावरेवाडी बंधारे दुसऱया दिवशीही पाण्याखाली 

वार्ताहर / नेसरी

हडलगे व तावरेवाडी येथील बंधाऱयावर दुसऱया दिवशीही पाणी राहिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. शुक्रवारी जरी पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने दुसऱया दिवशीही हे बंधारे पाण्याखालीच राहिले.

सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत बनले होते. बुधवारी रात्रीच्या झालेल्या जोराच्या पावसाने गुरूवारी हडलगे व तावरेवाडी बंधारे पाण्याखाली गेले होते. शुक्रवारी जरी पावसाने उसंत घेतली असली तरी बंधाऱयावरील पाण्यात वाढ होत असल्याने या मार्गावरील वाहतूक दुसऱया दिवशीही बंदच होती. बंधाऱयावरील व नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी नागरिकांसह तरुण, लहान मुले व शाळकरी मुलांचीही दिवसभर रेलचेल सुरू होती. आजअखेर 610 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related posts: