|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आंदोलनकर्त्या शेतकऱयांचा मंडप कोसळला

आंदोलनकर्त्या शेतकऱयांचा मंडप कोसळला 

प्रतिनिधी / बेळगाव

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱयांनी गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आला होता. तो मंडप शुक्रवारी कोसळला.

गेल्या दोन वर्षांपासून जिह्यात दुष्काळ पडला आहे. मात्र, काँग्रेस सरकारने शेतकऱयांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकऱयांनी अनेक वेळा आंदोलने छेडली. मात्र, त्याकडे सरकारने सोयीस्कर दुर्लक्ष केले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मंडप थाटून आंदोलन छेडले आहे. सलग 700 हून अधिक दिवस हे आंदोलन सुरूच आहे.

ऊन, पाऊस, वाऱयातच हे आंदोलन सुरू आहे. मंडपाच्या व्यासपीठावर मोठय़ा संख्येने शेतकरी ठाण मांडून बसलेले असतात. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱयामुळे हा मंडप कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.