|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑक्टोबरपर्यंत राहणार पावसाचा जोर

ऑक्टोबरपर्यंत राहणार पावसाचा जोर 

हवामान विभागाचा अंदाज, राज्य सरकारकडे अहवाल

प्रतिनिधी/ बेंगळूर

यंदादेखील राज्यात पावसाने ओढ दिल्याची चर्चा सुरू असतानाच आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने सरकारकडे अहवाल सादर केला असून ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.

यापूर्वी वेळेअगोदरच मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला. जुलैच्या आठवडय़ापर्यंत पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. आता आठवडाभरापासून राज्यभरात समाधानकारक पाऊस होत आहे. जुने म्हैसूर भागात पुरेसा पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे येथेही पावसाची आशा आहे. हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. प्रामुख्याने उत्तर कर्नाटक भागात पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. तर जुने म्हैसूर भागात येत्या तीन-चार दिवसात पुरेसा पाऊस होईल.