|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जावलीत पावसाचा जोर

जावलीत पावसाचा जोर 

वार्ताहर/ कुडाळ

जावली तालुक्यात पावसाचा जोर दिवसभरात वाढल्याने ओढय़ा-नाल्यांना पाणी जोरात वाहु लागले असून कुडाळ, मेढा, तसेच केघळर विभागात नदी-नालेöओढे  ओसंडून वाहु लागल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भात लागणीसाठी हा पाऊस फायद्याचा ठरत असल्याचे दिसू लागले आहे . 

जावलीत दिवसभर पावसाचा जोर वाढला असन पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जावलीत कुडाळ, मेढा, केरघळ विभागातील आंबेघर, केळघर, पुनवडी, केडांबे, म्हाते खुर्द, म्हाते बुद्रुक, वागदरे, या डोंगराळ भागातील गावांमधील तसेच डोंगर माथ्यावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पुलावरुन पाणी जात असल्याने सर्वसामान्य जनतेची अडचण होत आहे. महत्त्वाच्या कामांसाठीही घराबाहंल पडणे मुश्किल झाले आहे. 

काही वर्षीपूर्वी फरशी पुलावरुन पाण्याच्या प्रवाहातून जात असताना शाळकरी मुलगी वाहून गेल्याची घटनादेखील जावलीत घडली आहे.

जावलीत आपत्कालीन परिस्थितीत सजग असल्याची माहिती तहसिलदार रोहिणी आखाडे यांनी बोलताना दिली. पुनवडीसह केळघर तसेच जावळीत ठीक ठिकाणी विभागातील परिस्थितीची पहाणी करत तहसिलदार कार्यालयाचे कर्मचारी सजग असल्याची माहिती तहसिलदार रोहीणी आखाडे यांनी यावेळी  दिली.

Related posts: