|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नागनाथ अण्णांची जयंती उत्साहात

नागनाथ अण्णांची जयंती उत्साहात 

प्रतिनिधी/ म्हसवड

क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपस्थित होते. अण्णांच्या जयंतीनिमित्त संकुलातील उपशिक्षक अनिल काटकर यांनी अण्णांचे जीवनचरित्र व्यक्त केले. तसेच अवधूत काटकर, साहिल लवटे, विवेक भोसले या विद्यार्थ्यांनी  यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. मान्यवरांचे हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त  प्राचार्य लवटे, मुख्याध्यापक माने, राहुल फुटाणे, मुख्याध्यापिका जाधव, तसेच संकुलातील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी केले तर अशोक पवार यांनी मानले.

Related posts: