|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणात बंपर मोरी कॅच

मालवणात बंपर मोरी कॅच 

मालवण बंदर विभागाच्या दुर्लक्षामुळे मालवण समुद्रात राजरोसपणे बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा उघड झाले. मंगळवारी मालवण बंदरजेटी येथे बंपर मोरी लिलावासाठी दाखल झाली होती. 250 रुपये किलो दराने मोरी माशाची विक्री झाली होती. पर्यटन हंगाम अद्याप सुरू झालेला नसल्याने आणि इतर मार्केटमधील विक्रेतेही दाखल न झाल्याने मोरी कमी भावात विक्रीला गेली होती. बंपर मोरी दाखल झाल्यामुळे किनाऱयावर मोरीची रास पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हय़ातील इतरही काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मोरी सापडली होती. जिल्हय़ातील अनेक मच्छीमार्केटमध्येही आज बंदर मोरी विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.

मालवण बंदरातील काही मच्छीमारांवर बंदर विभागाने अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई केल्यानंतर ही कारवाई थांबली होती. मात्र, कारवाई काही दिवसांचीच ठरल्यानंतर पुन्हा मासेमारी सुरू झाली होती. अधिकृत मासेमारी हंगाम 1 ऑगस्टला सुरू होण्याअगोदरच मिळणारी मासळी कॅच करण्यासाठी काही मच्छीमार जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जात असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. मंगळवारी मालवण मच्छीमार्केट परिसरात मोठय़ा प्रमाणात मोरी लिलावासाठी उपलब्ध होती.

स्थानिक खवय्यांची चंगळ

मोरी मासा साधारणपणे 450 ते 500 रुपये किलो दराने विक्री होत असतो.  सध्या पर्यटन हंगाम नसल्याने तसेच जिल्हय़ातील अन्य व्यापारीही कमी संख्येने आल्याने मोरी अवघ्या 250 रुपये किलोने विक्रीला गेली. त्यामुळे स्थानिक खवय्यांची चंगळ झाली. मोरी मार्केटमध्ये आल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी  लिलावाच्या ठिकाणी एकच गर्दी केली होती.

 

Related posts: