|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » उद्योग » सहकारी बँकांचे व्यवहार होणार डिजिटल

सहकारी बँकांचे व्यवहार होणार डिजिटल 

  • मार्च 2018 पासून प्रारंभ आर्थिक वर्षात 25 अब्ज डिजिटल व्यवहार
  •  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

    मार्च 2018 पासून देशातील सर्व सहकारी बँकांचे व्यवहार डिजिटल स्वरुपात होतील असे नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) सांगण्यात आले. यूनिफाईड पेमेन्ट्स इन्टरफेस (यूपीआय) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये वापरण्यात येत आहेत, तसेच प्रमुख खासगी बँकांनी ही प्रणाली वापरण्यास प्रारंभ केला आहे. आता पुढील टप्प्यात ही प्रणाली देशातील सहकारी बँकांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. ज्या सहकारी बँकांचे आर्थिक व्यवहार संगणकांच्या माध्यमातून होत आहेत, त्या सर्व बँकांमध्ये डिजिटल व्यवहारांना सुरूवात करण्यास येईल, असे एनपीसीआयचे सीईओ ए. पी. होटा यांनी सांगितले.

    सध्या देशभरातील 56 बँका यूपीआयचा वापर करत आहेत. यूपीआय आधारित पेमेन्ट्स सेवा सुरू करण्यासाठी गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सऍप या कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहे. गुगलने आपल्या यूपीआय आधारित ऍन्ड्रॉईड पे सुविधा सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला आहे. चालू आर्थिक वर्षात 25 अब्ज व्यवहार डिजिटल माध्यमातून होतील असा केंद्र सरकारला विश्वास आहे. पहिल्या तिमाहीत 3.4 अब्ज व्यवहार झाले, असे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लक्ष्य गाढण्यास अपयश आले आहे. पहिल्या तिमाहीत 4 अब्ज डिजिटल व्यवहार होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 3.4 अब्ज झाले. चालू तिमाहीत यात वाढ करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आर्थिक वर्षात 25 अब्ज व्यवहारांचे लक्ष्य असून पहिल्या सहामाहीत 10 अब्ज आणि दुसऱया सहामाहीत 15 अब्जाचे लक्ष्य आहे.