|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून मनुष्याला होणारे आजार

बुध. 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2017

आजकाल कोणत्याही दवाखान्यात जा पेशंट भरलेले दिसतात. मनुष्यप्राणी म्हटल्यावर आजार हे असणारच. कुणाला केव्हा कोणता आजार होईल हे सांगता येणार नाही. पण बहुतांश आजार हे माणसानी स्वत:हून ओढवून घेतलेले आहेत हे स्पष्ट दिसून येते. आयुर्वेदात ज्योतिषशास्त्राच्याआधारे कुणाला कोणते आजार होऊ शकतात, याचे अतिशय सुरेख विवेचन केलेले आहे. चरकसंहिता, अथवा निघंटु, आरोग्य रत्नाकर वगैरे जुन्या ग्रंथात आजाराची जी कारणे दिलेली आहेत ती आजच्या घडीला तंतोतंत लागू पडतात. कर्मविपाक ग्रंथात तर पूर्वजन्मातील कोणत्या कर्मामुळे मनुष्यप्राण्याला कोणते आजार होतात याचे विवेचन आहे. पण काही रोग हे मानसिक विकारातून निर्माण होतात. ‘सर्व लक्षण हीनो पि य सदाचर वान्नर श्रद्ध धानो न सूर्यश्च शतं वर्षापि जिवती’ असे एक संस्कृत सुभाषित वाचण्यात आले. रुप, पैसा, अलंकार इत्यादी नसूनही जी व्यक्ती सदाचरणी, श्रद्धावान व मत्सररहीत असते ती व्यक्ती शतायुषी होते असा याचा अर्थ आहे. मानसिक पोषण, विश्रांती, शांती, निर्मलता या बाबी प्रार्थनेमुळे साध्य होतात. म्हणून रोजच्यारोज आपल्याला आवडणारी कोणतीही प्रार्थना म्हणावी. ईर्षा, असूया, मत्सरामुळे कोणते रोग होतात याची थोडक्मयात माहिती खाली दिलेली आहे. त्यानुसार वागल्यास बरेच रोग आटोक्मयात येऊ शकतात. जे सतत दुसऱयाचा द्वेष करीत असतात त्यांना मुत्राशयांसंदर्भातील विकार होतात. मत्सरामुळे पित्ताशय व हृदयरोग, पित्तखडे, भीतीमुळे पचनक्रिया बिघडणे, सुवर्णलंकारांची अती हाव, कंजूषपणा, स्वार्थी वृत्ती, अधाशीपणा यामुळे पुटकुळय़ा, अपचन व आत्महत्या, चिंता काळजीमुळे मज्जातंतू बिघडणे, अल्झायमर, तीव्र मनक्षोभामुळे सर्दी, अती संतापामुळे फिटस येणे अति चिंतेमुळे कावीळ, एकदम मानसिक धक्का बसण्यामुळे मधुमेह यासह असंख्य रोग होतात. त्यामुळे अशा रोगापासून बचाव होण्यासाठी औषधोपचाराबरोबरच राग, द्वेष, मत्सर, लोभ यांचा त्याग करून आनंदी वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न केल्यास बरेच रोग आटोक्मयात येऊ शकतात. स्मितहास्यामागील दु:ख, तुमच्या क्रोधामागील प्रेम व आपुलकी व तुमच्या शांततेमागील कारण जे समजू शकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे म्हणतात. अशा व्यक्तीमुळे आरोग्य सुधारू शकते. कोणत्या ग्रहयोगामुळे कोणते आजार निर्माण होऊ शकतात, हे ज्योतिषशास्त्राधारे समजून घेतल्यास आजारावर नियंत्रण ठेवता येणे शक्मय आहे. शनि, मंगळ युती अपघात दर्शवते पण त्याची वेळीच कल्पना आल्यास अपघात व त्या अनुषंगाने होणारी शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकेल. इतरांचा द्वेष करण्याची भावना ठेवणे हा एक प्रकारचा मानसिक कर्करोग आहे. क्रोध वाढल्यास रक्तात विष तयार होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. मज्जातंतू क्षीण होतात हे लक्षात ठेवावे. प्रत्येकाला ज्याच्यात्याच्या पूर्वसंचिताप्रमाणे चांगले किंवा वाईट भोग भोगावे लागतात. एखादा माणूस कष्टाने प्रगती करून घेतो पण ईर्षाळू लोकांना त्याचे कष्ट दिसत नाहीत व ते त्याचा द्वेष अथवा मत्सर करू लागतात. त्याचे प्रमाण वाढले की त्याचे रुपांतर नको त्या भयानक रोगात होते. यासाठी आरोग्य चांगले रहावयास हवे असेल तर राग, द्वेष, मत्सर, पोटदुखी यांचा त्याग करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदीवृत्तीमुळे बरोच आजार कमी होऊ शकतात. असे अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे, वर रोगांची कारणे व  उद्भवणारे रोग याविषयी जी माहिती दिलेली आहे ती फक्त एक छोटीसी झलक आहे.

 

मेष

नवे व्यवसाय वा कौटुंबिक धोरणासाठी आर्थिक पाठबळ मिळण्यास सुरुवात होईल. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी, व्यवसायात योग्य भागीदारीच्या सहाय्याने सहकार्य वाढेल. श्तावर मालमत्ता, शेती, जमीन, यात गुंतवणूक करताना तज्ञ लोकांचा सल्ला घ्या. अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य व नातेसंबंधासाठी उत्तम काळ. शिक्षणात प्रगती दिसून येईल.


वृषभ

या सप्ताहात नोकरी व्यवसायाच्या कामात काही बदल संभवतात जे आपल्यासाठी भाग्यकारक ठरतील. तारतम्याने निर्णय घ्या. मित्र मैत्रिणींच्या नातेवाईकांच्या सहवासाचा सुखद अनुभव येईल. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. योग्य परिश्रमाचे फळ म्हणून आर्थिक आवक चांगली राहील. शारिरीक बाबतीत विशेषत: थंडीचे विकार व अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. शिक्षणात संमिश्र प्रगती, अभ्यासावर थोडे जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज.


मिथुन

गुंतवणुकीचे ग्रहमान आहे. वाहन, स्थावर खरेदी योग आहेत. विचारपूर्वक निर्णय घ्या. विशेषत: काही योजलेल्या गुंतवणुकी प्रत्यक्षात येण्यासाठी उत्तम काळ. प्रवासावेळी वाहनाची योग्य तपासणी करून घेणे इष्ट ठरेल. भाऊबंदकी, वैमनस्य यातून सामोपचाराचा तोडगा निघेल. गृहिणीवर्गासाठी काही गृहोद्योग वा तत्सम सुवर्णसंधी येतील. कौटुंबीक सौख्य मध्यम. शिक्षण, आरोग्य, आर्थिक बाबतीत उत्तम काळ.


कर्क

चालू सप्ताहात घरातील नातेसंबंधात आलेले ताणतणाव, त्रागे, त्रास कमी होणाऱया संधी आपण होऊन चालून येतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. देवकार्यात विशेष रुची घ्याल. भावंडांसाठी वेळ काढणे, देणे सोयीस्कर ठरेल. मंगलकार्याचे संकल्प सिद्ध होतील. इच्छित कार्याचा शुभारंभ करण्यासाठी परिपूर्ण योग्य कालावधी. नेत्र, वातविकारापासून काळजी घ्या.


सिंह

काही कार्याच्या निमित्ताने परिवारात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. शेती व पूरक व्यवसायात उत्तम फलदायक उद्योगधंद्यात काही सुयोग्य बदल केल्यास सर्वोत्तम यशप्राप्ती. फक्त भागीदारीमध्ये मतभेद वा वाद टाळणे गरजेचे. पूर्वी आपण केलेल्या काही सामाजिक कार्याची योग्य पोचपावती मिळेल. कौतुक/ आभार प्राप्त होईल. शेअर बाजार, सट्टा वा तत्सम संबंधातील गुंतवणूक विचारपूर्वक करा. काही धाडसी निर्णय घ्यायला लावणारा काळ.


कन्या

बऱयाच काळापासून असलेली बेचैनी, मानसिक द्विधा परिस्थिती, करू की नको हा गोंधळ, भीतीयुक्त काळजी दूर होण्यास सुरुवात होईल. मानसिक, आर्थिक विवंचनेतून बाहेर पडाल. विशेषत: महिला वर्गासाठी गृहकर्तव्ये व गृहोपयोगी व्यवसायासाठी उत्तम काळ. मात्र अती दगदग होऊन शारीरिक अस्वास्थ्य होणार नाही याची काळजी घ्या. काही क्षेत्र कुशलवार्ता समजतील. मुलाबाळांच्या आरोग्याची विशेषत: पथ्यकुपथ्यांची काळजी घ्या.


तुळ

कायम संतुलित निर्णय घेताना आलेले ताण व दडपण, साडेसातीचे चटके व बौद्धिक तणाव यातून होणारी मार्गक्रमणा काही प्रमाणात दिलासा देईल. जुनी येणी, स्थावराचे प्रलंबित प्रश्न, नोकरीतील चढउतार निवळतील. कोर्टमॅटर, दिवाणी शेती इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. साहित्यिकांसाठी विशेष संधी चालून येतील. कौटुंबिक बाबतीत सर्वोत्तम काळ, जोडीदाराशी योग्य समन्वय होईल. प्रवासाचे योग आहाराचे व श्रमाचे संतुलन ठेवा.


वृश्चिक

चालू कार्यात काही बदल देणारे संकेत. आपल्यात असलेल्या कलागुणांना व संपूर्ण गुणवत्तेला साजेशी संधी प्राप्त करून देणारे अनुकूल सुखावह बदल संभवतात. वैवाहिक जोडीदाराबरोबर काही बाबतीत तडजोड केल्यास उत्तम. नोकरी, व्यवसायात ज्ये÷ व अनुभवी लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष वा कानाडोळा करू नका. तोटा होईल. जुन्या वास्तूचे  नूतनीकरण होण्याचे योग. राजकीय कुरघोडय़ांना लगाम बसेल. बऱयाच बाबतीत मात कराल.


धनु

बऱयाच काळापासूनची एखादी जुनी व्यक्ती, नातेसंबंध वा येणी स्वरुपाची लाभदायक घटना घडेल. देवकार्य व धार्मिक कार्य यात आवडीने रममाण व्हाल. शेती, नोकरी व्यवसायात परिश्रमात थोडी उसंत मिळेल. काही हितशत्रू डोकी वर  काढण्याची शक्मयता आहे. सतर्क रहा. गृहिणींना गृहकर्तव्यात पंचपक्वान्नाचे बेत व योग. एखादे वाहन, वस्तू खरेदी करण्याचा प्रसंग येईल. काळजीपूर्वक निर्णय घ्या. शारीरिक बाबतीत वातविकारांपासून जपा.


मकर

सार्वजनिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हाल. घरात एखादे  मंगलकार्य, प्रयोजन, नियोजन ठरण्याची शक्मयता. खर्चात वाढ दर्शविणारे ग्रहमान अवास्तव खर्च टाळा व योग्य गुंतवणूक करा. व्यापारीवर्गाने आपली प्रतिमा जपण्याची गरज. सचोटीने व्यवहार केल्यास उत्साहवर्धक यशप्राप्ती. शेती जमीनधारणा व धोरणात बदल केल्यास उत्तम. देवकार्य व धार्मिकदृष्टीने सहल, यात्रा यांच्यानिमित्त प्रवास घडेल. घशाच्या विकारापासून जपा.


कुंभ

आपल्या धिरगंभीर व्यक्तिमत्त्वाला काही समाजघटक व नातेवाईकांकडून सुखद, आल्हाददायक वातावरण निर्मिती होईल. उद्योगधंद्याच्या निमित्ताने प्रवास घडतील. जुनी नाती, मित्रमंडळी यांचा सहवास लाभेल. अबोलपणाचे काही तोटे लक्षात घेऊन आपल्या भावना, कल्पना योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल. साहित्य, सामाजिक व आर्थिक बाबतीत उत्तम काळ. पचनाच्या तक्रारी संभवतात. आरोग्याची काळजी घ्या.


मीन

या सप्ताहात काही संधी चालून आल्या तर त्याचा तारतम्याने विशेष लाभ घ्याल. बेरोजगारी वा आर्थिक कुंचबणा यातून दिलासा मिळेल. युवायुवतींनी इतर अवास्तव बाबींपेक्षा शिक्षण व परिवारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे सर्व सहमतीचे निर्णय घेतल्यास सर्व समस्यांवर योग्य इलाज होईल. विरोधक बदलून मित्र होतील. गैरसमज, समजूती, गैरविश्वास टाळा. सांध्याचे विकार, सर्दी, पडसे, खोकला यासारख्या विकारांवर वेळीच इलाज करा.