|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बसर्गेच्या तरूणीची विष प्राशन करून आत्महत्त्या

बसर्गेच्या तरूणीची विष प्राशन करून आत्महत्त्या 

वार्ताहर/ कार्वे

बसर्गे येथील पुजा महादेव गोंधळी (वय.20) या तरूणीने नैराश्येतून विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्त्या केली.

पुजा ही बी. ए. च्या दुसऱया वर्षात शिकत होती. सोमवारी सकाळी कॉलेजला जातो म्हणून सांगून घरातून बाहेर पडली. पाटणे फाटय़ाजवळच विषारी किटकनाशक प्राशन केले. किटकनाशक प्राशन केल्याने तिला त्रास होऊ लागल्याने जवळच असलेल्या विहीरीजवळ पाणी पिण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडली. आजुबाजूच्या लोकांनी तिला विहिरीतून बाहेर काढले. घरी नेऊन प्रथमोपचार केले. मात्र तिला अधिक त्रास जाणवू लागला. त्यात तिला उलटय़ा होऊ लागल्याने तात्काळ बेळगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले. तिथेही तिची प्रकृत्ती खालावल्याने तिला तात्काळ केएलई रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारांना साथ न मिळाल्याने मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पुजा ही गरीब कुटुंबातील असून आई-वडील मोलमजुरी करून घर चालवितात. तर तिचा भाऊ शिनोळी येथे खाजगी कंपनीत रोजंदारीवर कामास जातो. या आत्महत्त्येची वर्दी पुजाचे मामा चंद्रकांत विठोबा बागडी रा. दुंडगे यांनी चंदगड पोलीसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघ, पोलीस नाईक संतोष साबळे करीत आहेत.

Related posts: