|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वाईन फ्ल्यूचा फास आवळतोय,सात महिन्यात

स्वाईन फ्ल्यूचा फास आवळतोय,सात महिन्यात 

प्रतिनिधी/ सांगली

 पावसाळा आणि वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जानेवारीपासून सांगली जिल्हयात सोळा पैकी चार रूग्णांचा  स्वाईन फ्ल्यू ने मृत्यू झाला आहे.  तर गेल्या आठ ते दहा दिवसांत तीन स्वाईन फ्लूचे रूग्ण दाखल झाले होते.त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथील एका युवकाचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने गावात स्वच्छता आणि औषध फवारणी केली. संशयित रूग्णांची तपासणीही केली. पण नंतर त्या मृताचा प्रयोगशाळेचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वाचाच जीव भांडय़ात पडला. अन्य शहरांप्रमाणे स्वाईन फ्ल्यूचे सांगलीत रूग्ण आढळत नसले तरी यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनीही घाबरून न जाता परिसर स्वच्छतेबरोबरच दक्षता घेतली पाहिजे.

 शहरासह जिल्हयात दाखल झालेल्या  स्वाईन फ्लूच्या रूग्णांची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे कळवणे सर्व हॉस्पीटलना सक्तीचे करण्यात आले आहे. तरीही मिरजेतील एका मोठया हॉस्पीटलमध्ये स्वाईन फ्ल्यू ने मृत्यू झालेल्या रूग्णाची माहिती दिली नसल्यावरून नातेवाईकांसह एका संघटनेनेही आंदोलन केले. एकूणच सध्याची परिस्थीती पहाता स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूच्या दाखल झालेल्या सोळा  पैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा मृत्यूनंतर स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

गेल्या आठवडयात स्वाईन फ्लूच्या दाखल करण्यात आलेल्या संशयित दोन रूग्णांचे स्वॅब पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे .पण दोघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू झाला असला तरी सांगली शहरासह जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नाही.पण वातावरणातील बदलामुळे सध्या थंडी ताप सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. याच आजारातून पुढे स्वाईन फ्ल्यू चा विषाणू हल्ला करू शकतो. परिणामी स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण दाखल होण्याची शक्यता जास्त आहे.

गेल्या सहा महिन्यात वसंतदादा सर्वोपचार रूग्णालय आणि खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लूचे 16 संशयित रूग्ण दाखल झाले होते. त्यातील पाच रूग्णांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर गतवर्षी स्वाईन फ्लूचे अठरा संशयित रूग्ण दाखल झाले होते.पण सन 2015 या वर्षात स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली होती. त्या वर्षभरात 272 संशयित रूग्ण आढळले होते. त्यातील 75 रूग्णांची तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला होता.तर 26 जणांचे मृत्यू झाले होते. तेव्हापासून सिव्हीलमध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांसाठी स्वतंत्र विभागाच सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्लूच्या संशयित रूग्णांवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. चोवीस तास अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी व्हेन्टीलेटरही राखीव ठेवण्यात आली आहेत. आपगोंडा नरसगोंडा पाटील वय 82 रा.कोरोची ता.हातकणंगले येथील वृध्दाच्या स्वाईन फ्ल्यू ने नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रूग्णालयासह शासकीय आरोग्य यंत्रणाही जागी झाली आहे.

त्यापुर्वी  सांगलीतील कलानगर येथील एक महिला स्वाईन फ्ल्यू मुळे वसंतदादा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आली आहे. पण त्यानंतर परिसरात औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात आली. महापालिका क्षेत्रात अद्यापही घाणीचे साम्राज्य आणि दलदल,डुकरांचा सुळसुळाट आहे. यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

 लक्षणे 

घसा दुखणे, सुरवातीला ताप येतो,खोकला अशी लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळतात. पण पुढे खोकला आणि ताप वाढत गेल्यास न्युमोनियाची लागन होते. मधुमेह,जुनाट दमा असणारे ज्येष्ठ तसेच लहान मुलांना धोका जास्त असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना स्वाईन फ्ल्यूचा धोका जास्त असतो. त्यामुळे यापैकी कोणताही आजार झाल्यास घरगुती  उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.  

  सिव्हीलमध्ये चोवीस तास कक्ष,नागरिकांनीही दक्षता घ्यावीःडॉ.साळुंखे

स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच गंभीर रूग्णांसाठी अतिदक्षात विभागात व्हेन्टीलेटर राखीव ठेवण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.संजय साळुंखे यांनी केले आहे. कोणताही ताप हा स्वाईन फ्ल्यू नसतो.त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांसचा सल्ला घ्यावा.पुर्ण वेळ विश्रांती घ्यावी.  सकस आहार योग्य व्यायामावर भर द्यावा. पावसाळयात हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णतःटाळावे. असे आवाहनही डॉ.साळुंखे यांनी केले आहे.

 

 

Related posts: