|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » मार्चपासून एअरटेलची व्हीओएलटीई सेवा

मार्चपासून एअरटेलची व्हीओएलटीई सेवा 

नवी दिल्ली :  

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीसपासून संपूर्ण देशभरात व्हीओएलटीई सेवा सुरू करण्याचा भारती एअरटेलची योजना आहे. या व्हीओएलटीई 4जी तंत्रज्ञानाने फोनवरून इंटरनेट कॉल करण्याची सुविधा असते. सध्या देशातील पाच ते सहा शहरांत या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. पुढील 6 ते 9 महिन्यात संपूर्ण देशात ही सुविधा लागू होईल असे कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी सांगितले. सध्या 4जीचा वापर व्हीओएलटीई तंत्रज्ञान देशात रिलायन्स जिओकडून देण्यात येते. अन्य ऑपरेटर्स 2जी आणि 3जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 4जी ग्राहकांना व्हॉईस कॉलची सेवा देतात.

Related posts: