|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वैफल्यग्रस्त विरोधकांकडून जातीच्या दाखल्याची बालीश तकार

वैफल्यग्रस्त विरोधकांकडून जातीच्या दाखल्याची बालीश तकार 

वार्ताहर/ मुरगूड

  विरोधकांच्या चारीमुंडय़ा चित करणाऱया पालिकेतील पराभवानंतर कोणतीच सत्ता नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे कोणतीच सत्ता नसल्याने उचापती काढण्याचा उद्योग म्हणून माझ्या जातीच्या दाखल्यावर विरोधक आक्षेप घेत आहेत. त्यांच्या आडाणी व बालिश तक्रारीत कोणतेही तथ्य नसून न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत बसलेल्या दाखल्याबाबत बोगसगिरी उघड झाली तर कोणतीही शिक्षा भोगण्यास आपण तयार आहोत. मात्र तक्रारी सिध्द न झाल्यास 50 लाखाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत अशी माहिती मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली.

दोनच दिवसापूर्वी संदिप भारमलांसह विरोधकांनी नगराध्यक्ष जमादार यांचा ओबीसीचा बोगस दाखला असल्याने त्याविरोधात आपण हायकोर्टात आपिल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आज नगराध्यक्ष जमादार यांनी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी समर्थकांसह पालिकेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. विरोधकांच्या या खेळीचा खरपूस शब्दात जमादार यांनी समाचार घेतला.

जमादार म्हणाले, पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट मतदारांकडून माझी 2 हजाराहून अधिक मतांनी निवड केली आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली अपक्षंासह 14 नगरसेवक असलेल्या शिवसेनेची पालिकेवर सत्ता आहे.  नागरिकांच्या अपेक्षा पूर्ती करणारी पालिकेची विकासाभिमूख वाटचाल सुरू आहे. निवडणूकीतील अपयशाने वैफल्यग्रस्त झालेल्या विरोधकानी व्यक्तीद्वेषापोटी जातीच्या दाखल्याबाबत खोटे आरोप केले आहेत. पालिकेच्या राजकारणात गेली 20 वर्षे आपण सक्रिय आहे. 1996 साली पालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झालो. 2006 साली प्रभाग 6 मध्ये ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली. 2010 साली बिद्री कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांच्याच आघाडीतून आरक्षणातून निवडणूक जिंकली. तत्पूर्वी 2007ची मंडलिक कारखाना निवडणूकदेखील या आरक्षणातून लढलो. मात्र एवढय़ा प्रदिर्घ कालखंडानंतर विरोधकांना हा दाखला बोगस असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

 लोकशाहीमध्ये विकासकामे आणि त्यांच्या कमी-अधिक प्रमाणाबाबत आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजून घेऊ पण जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात खोटे-नाटे आरोप करून बदनामी केल्याने विरोधकांनी लोकभावनेचा अनादर व स्वाभिमानी जनतेचा अपमान केला आहे. सत्ता असो वा नसो लोकांच्या अडचणी सोडवण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. लोकांच्या भल्यासाठी सक्रीय राहण्याची शिकवण दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी दिली आहे. विरोधकांच्या नाहक आरोपांवर सुज्ञ जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. विरोधकांनी व्यक्तीद्वेशापोटी आदळा-आपट करू नये.

 जमादार यांचा न्यायालयीन लढाईचा खर्च लोकवर्गणीतून करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात येऊन दत्ता मंडलिक, भगवान लोकरे, सम्राट मसवेकर आदींनी त्यासाठीच्या रकमाही देण्याचे जाहिर केले. यावेळी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, नगरसेवक शिवाजी चौगले, दिपक शिंदे, विशाल सुर्यवंशी, मारूती कांबळे, प्रतिभा सुर्यवंशी, रंजना मंडलिक, रूपाली सणगर, वर्षाराणी मेंडके, अमर सणगर, सचिन मेंडके, अनिल राऊत, राजेंद भाट, अमर सणगर, सुहास खराडे, पांडुरंग चौगले, दिपक माने, संजय चौगले यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. 

                 भ्रष्टाचाराची चौकशी लावली म्हणूनच तक्रार!

   विरोधकांनी पालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू केली आहे. लवकरच त्याबाबत आम्ही माहिती पुरवून भ्ा्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू. या  प्रयत्नामध्ये अडथळा आणण्यासाठीच जातीच्या दाखल्याच्या तक्रार करून आमचे लक्ष विचलीत करण्याचा विरोधक दुबळा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष जमादार यांनी केला.

              ‘कुणबी’साठी तुम्ही केलेल्या धडपडीचे काय?

    आरक्षित नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होण्यासाठी कुणबी दाखला मिळवण्याकरीता 10-15 गाडय़ा नेऊन आमदारांमार्फत अधिकाऱयांवर दबाव आणण्याचा विरोधी नेत्यांनी प्रयत्न केला. पण कर्तव्यदक्ष अधिकाऱयांपुढे तुमची डाळ कांही शिजली नाही. अशी पुष्टीही नगराध्यक्ष जमादार यांनी माहिती देताना जोडली.

Related posts: