|Sunday, January 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गृहीणी सक्षम तर कुटूंबाचे परिवर्तन

गृहीणी सक्षम तर कुटूंबाचे परिवर्तन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 गृहीणी आर्थिक दृष्टय़ा सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंबाचे परिवर्तन होते. बदलत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळालीये. याचा फायदा घेवून त्यांनी स्वताच्या पायावर उभे राहावे. असे प्रतिपादन भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. भागीरथी संस्था आणि सखी महिला मंडळातर्फे गडहिंग्लज येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 गडहिंग्लज येथे महिला मेळावा, प्रशिक्षण शिबीर आणि बचत गट स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजय केदार, सखी मंडळाच्या अध्यक्षा अरूणा शिंदे, सचिव उज्वला दळवी आणि गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे महाडिक यांनी बचत गटांच्या उद्दीष्ठ आणि योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, शशिकला पाटील, क्रांती शिवणे, सुनंदा गुंडे, अरूणा शिंदे, अलका भोईटे, शारदा आजळकर, सुवर्णलता गोईलकर, उज्वला दळवी, सविता चव्हाण, गीता पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

Related posts: