|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ मुख्याध्यापकाची बदली करणार

‘त्या’ मुख्याध्यापकाची बदली करणार 

वार्ताहर/   बुगटेआलूर

गढूळ पाण्यामध्ये मध्यान्ह आहार शिजविण्यास स्वयंपाकी महिलांसह मुख्याध्यापकच जबाबदार आहेत. त्यांना शाळेतून हटविल्या खेरीज शाळेत दुपारचे जेवण सुरू करण्यात येणार नाही, असा पवित्रा शाळा सुधारणा व अभिवृद्धी समितीने घेतल्याने जिल्हा अक्षरदासोह अधिकारी एम. डी. बेग यांनी शाळेला बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी सदर मुख्याध्यापकाची अन्यत्र बदली करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

भैरापूर तलावातील गढूळ पाण्याने दुपारचे जेवण तयार केल्याचा प्रकार बुगटेआलूर येथील सरकारी मराठी शाळेत मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्याची गंभीर दखल घेत बुधवारी जिल्हा मध्यान्ह आहार योजनेचे अधिकारी एम. डी. बेग यांच्यासह पथकाने शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालेले परिणाम पाहून तातडीने मुख्याध्यापक ए. जी. कांबळे यांची इतरत्र बदली करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी तात्पुरते शाळेतच जेवण बनवण्याची सूचना शिक्षण व शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी केली.

यावेळी तालुका अक्षरदासोह अधिकारी अरिहंत बिरादार पाटील, सीआरसी डी. ए. फफे, शाळा सुधारणा अध्यक्ष एकनाथ माद्याळकर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष चंद्रकात पाटील, शिवाजी रावण, शिवाजी कोरे, शशिकांत सांळूखे, एकनाथ रावण, नविनकुमार पालकर, शिवराज पाटील, रोहित रामनकाटे, बजरंग हणबर, नितीन माने, संजय माने, तानाजी रावण, अनिता खामकर, सुनिता दिवेकर सह पालकवर्ग उपस्थित होते.

Related posts: