|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » प्रारंभिक तेजीनंतर भांडवली बाजार समपातळीवर स्थिर

प्रारंभिक तेजीनंतर भांडवली बाजार समपातळीवर स्थिर 

 मुंबई / वृत्तसंस्था

अमेरिकच्या फेडररिजर्व्हकडून व्याजदर स्थिर ठेवण्याचा दिलासादायक वृत्त आल्याने भारतासह सर्व जागतिक बाजार तेजीसह उघडले. मात्र जूलै वायदेबाजाराच्या मुदतपुर्तीच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारात दबाव दिसून आला. नफावसुलीसाठी गुतवणूकदारांनी विक्रीवर जोर दिला. त्यामुळे भांडवली बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास कालच्या समपातळीत बंद झाले. तत्पूर्वी दिवसभराच्या काराभारादरम्यान सेंसेक्सने ऐतिहासिक पातळीला स्पर्श करून नवीन विक्रम रचला.

गुरूवारच्या सत्रात 32,672.66 पर्यंत पोहचलेला बीएसईचा सेंसेक्स  0.84 अंकाच्या किरकोळ वाढीसह 32,383.30 वर बंद झाला. तर 10,114.85 च्या नवविक्रमी पातळीला स्पर्शलेला निफ्टी सत्राच्या अंताला 0.10 अंकाच्या घसरणीसह 10,020.55 वर विसावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. बीएसईच्या मिडकॅप निर्देशांकात 0.6 तर निफ्टीच्या मिडकॅप 100 निर्देशांकात 0.3 टक्कयांची घसरण झाली. तर बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

औषध निर्माण, धातू, वाहन निर्मिती, एफएमसीजी कंज्यूमर ड्य़ुरेबल्स, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा समभागामध्ये विक्री दिसून आली. निफ्टीचा फार्मा निर्देशांक 1.6, धातू निर्देशांक 1 तर एफएमसीजी निर्देशांक 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर बीएसईच्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.7, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू निर्देशांक 0.5 अन् ऊर्जा निर्देशांकात 0.3 टक्क्यांची पडझड झाली. बँकिग आणि प्रसार माध्यमांच्या समभागात चांगली खरेदी दिसून आली. बँक निफ्टी 1 टक्क्यांनी वधारत 24,922.4 वर बंद झाला. दिवसभराच्या कारभारी सत्रात बँक निफ्टी 25,000 च्या पलीकडे जाण्यास यशस्वी झाला होता. निफ्टीचा खासगी बँक निर्देशांक 0.9 टक्के तर मीडिया निर्देशांक 0.3 टक्क्यांनी मजबूत झाला.

  दिग्गज समभागांची कामगिरी

एचडीएफसी, येस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, झी एंटरटेंनमेंट, एसीसी, एशियन पेंट्स हे समभाग 5.80 ते 1.31 टक्क्यांनी वधारले. डॉ रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, टीसीएस, इंडिया बुल्स हाउसिंग, भारती एअरटेल, इन्फोसिस हे समभाग 3.21 ते 2.31 टक्क्यांनी घसरले.

    मिडकॅप समभागात आयजीएल, भारत फायनान्स, व्होल्टास, जस्ट डायल, इंडिया सिंमेंट्स, आयआरबी इंन्फ्रा, रिलायन्स पॉवर हे समभाग 3.99 ते 1.12 टक्क्यांनी वधारले.

 

Related posts: