|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाडघरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाड 

वाळपई :

सत्तरीतील विविध भागात पुरविण्यात येणाऱया घरगुती सिलिंडर यांची गुरुवारी आकस्मिकपणे तपासणी करण्यात आली आहे. अडवई येथे घालण्यात आलेल्या महत्त्वाच्या धाडीत डिचोली मोजमाप कार्यालयाचे अधिकारी गुलाम गुलबर्गा यांच्या नेतृत्वाखाली वाळपईचे अधिकारी राजेश आर्लेकर व इतरांनी यात भाग घेतला.

सांखळी भागातून एचपी गॅस सिलिंडर वितरण करण्यात येत आहे. यात नियोजनप्रमाणे कमी वजनाचा सिलिंडर येत नाही असल्याचा तक्रारी काही ग्राहकांनी केलेल्या होत्या. याला अनुसरुन आज सकाळी अडवई भागात जाणाऱया गाडीचा पाठलाग करीत ही गाडी वाटेवर अडवून तपास करण्यात आला. एकुण 50 सिलिंडर भरलेले होते. त्याचे वजन करण्यात आले असता सर्व सिलिंडरमध्ये योग्यप्रकारे वजन असल्याचे स्पष्ट झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

तसेच रिकाम्या सिलिंडर तपासणी करण्यात आली होती, मात्र कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, मात्र येणाऱया काळात अशाप्रकारे कारवाई करण्यात येणार आहे व अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एचपी गॅस सिलिंडर पुरविण्याची एजन्सी सांखळी येथे कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत सिलिंडर पुरवठा करण्यात येत आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!