|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » ‘इंदू सरकार’ विरोधात काँग्रेस आक्रमक, चित्रपटाचे शो पाडले बंद

‘इंदू सरकार’ विरोधात काँग्रेस आक्रमक, चित्रपटाचे शो पाडले बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रिम कोर्टाने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होताना दिसत नाही.शुक्रवारी सकाळी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पहायला मिळतो आहे.

वेगवेगळय़ा ठिकाणी काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यासाठी निदर्शन केली जात आहे. ठाणे,जळगाव तसेच नाशिकमध्ये सिनेमाला जिल्हा काँग्रेसकडून बंद करण्यात आला.तर नाशिकमधील फेम थिएटरसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने केली जात आहेत. जळगावमधील काही सिनेमागृहामधील सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. कल्याणच्या आयनॉक्स थिएटरमधील शोही बंद पाडण्यात आला आहे. कल्याणमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.

 

Related posts: