|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सवात डॉल्बीवर बंदी कायम

गणेशोत्सवात डॉल्बीवर बंदी कायम 

प्रतिनिधी / बेळगाव

गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. या संबंधी विशेष कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने 4 जुलै रोजी डॉल्बी बंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी पोलीस समुदाय भवन येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आमदार संभाजी पाटील, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी व्यासपीठावर होते. श्रीमूर्तींची उंची 10 फुटांपेक्षा अधिक असू नये. याची कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मंडपात पोलीस असणारच आहेत. त्यांच्या बरोबरच जास्तीत जास्त स्वयंसेवक ठेवण्यात यावेत. खास करुन डॉल्बीचा वापर काटेकोरपणे टाळावा. डॉल्बी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांना देण्यात आली आहे. प्रसंगी मिरवणुकीतच ते जप्त करण्यात येणार आहे, असे कृष्णभट्ट यांनी सांगितले.

‘सोशल मीडीया मॉनिटरिंग विभाग’

सोशल मीडीयावर अफवा पसरविणाऱयांचा शोध घेण्यासाठी आता बेळगावात ‘सोशल मीडीया मॉनिटरिंग विभाग’ सुरु करण्यात आला आहे. व्हॉट्स-अप, फेसबुक आदींच्या माध्यमातून अफवा पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱयांचा शोध घेणे या विभागाच्या माध्यमातून शक्मय होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणेही सोपे होणार आहे. अफवा पसरविणाऱयांचे मूळ शोधून त्यांना कायद्याचा हिसका दाखविण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

यावेळी आमदार संभाजी पाटील म्हणाले, बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. परराज्यातूनही देखावे पाहण्यासाठी भाविक बेळगावला येतात. याचा विचार करुन अत्यंत शिस्तबद्धपणे व शांततेत उत्सव साजरा करण्यात येतो. बेळगाव शहराचा विस्तार झपाटय़ाने वाढतो आहे. त्याबराब्sारच गणेशोत्सव मंडळांची संख्याही वाढती आहे. सुरक्षेचा विचार करुन पोलीस दलाने जादा कुमक तैनात करावी. प्रत्येक मंडपात एक ऐवजी दोन पोलीस ठेवावेत. असा सल्ला देण्याबरोबरच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

एक खिडकी कार्यालय सुरु करा

गणेशोत्सव महामंडळाचे विकास कलघटगी यांनी बैठकीत अनेक सूचना मांडल्या.  शहर व उपनगरात 357 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. उत्सवासाठी महानगरपालिका, हेस्कॉम, पोलीस, अग्निशमन दल आदी विविध खात्यांकडून परवानगी घ्यायची गरज असते. गेल्या वषी पाच ठिकाणी एक खिडकी कार्यालये सुरु करण्यात आली होती. यावषीही या कार्यालयांची संख्या वाढवावी.

किमान 15 दिवस आधी एक खिडकी योजना सुरु करावी. उत्सवाच्या आधीच रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी. प्रमुख ठिकाणी प्रखर दिव्यांची व्यवस्था करावी. गणेश भक्तांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. परिवहन मंडळाशी संपर्क साधून रात्री उशीरापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात यावी. उशीरापर्यंत हॉटेल सुरु ठेवावीत. पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरु करण्यात याव्यात, वनिता विद्यालयापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत प्रेक्षक गॅलरीची उभारणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी माजी नगरसेवक रणजीत चव्हाण- पाटील, नगरसेवक दीपक जमखंडी, रमेश सोनटक्की, श्रीनिवास ताळुकर, बाबुलाल राजपुरोहित आदींची भाषणे झाली. लवकरात लवकर एक खिडकी केंदे सुरु करण्यात येतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक पोलीस स्थानकात ही केंदे सुरु करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. रस्त्यांची डागडुजी करताना लाल मातीचा वापर करण्यात येत आहे. ते त्वरित थांबवावे. कारण त्यामुळे नागरिकांचे कपडे घाण होत आहेत, अशी सूचना करण्यात आली.

Related posts: