|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईमॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्चचे उद्घाटन

ईमॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्चचे उद्घाटन 

बेळगाव / प्रतिनिधी

सेंट झेवियर्स हायस्कूल कॅम्प आवारातील ईमॅक्मयुलेट कन्सेप्शन या नवीन चर्चचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी पार पडला. या चर्चचे नुकतेच बांधकाम पूर्ण झाले असून गोवा चर्च अथवा गोयंची इगोर्झ म्हणून हे चर्च सर्वत्र परिचित आहे. दमण गोव्याचे आर्चबिशप रेव्हरंड फिलिप नेरी फेराव यांच्या हस्ते नवीन चर्चचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गोव्याचे आर्चबिशप डेरेक फर्नांडिस, बिशप पिटर मचाडो यांचे स्वागत करण्यात आले.

धर्मबांधवांसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साहाचा आहे. आपल्या धर्मगुरुंनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून काही काळ उपासना करून दररोज काही क्षण शांतपणे प्रार्थनेत घालवणे गरजेचे असल्याचे फिलिप नेरी फेराव यांनी सांगितले.

यावेळी कारवारचे रेव्हरंड डेरेक फर्नांडिस, बेळगावचे रेव्हरंड बिशप पिटर मचाडो यांच्यासह ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. तसेच राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related posts: