|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पीक विमा योजनेचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा

पीक विमा योजनेचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा 

वार्ताहर/ केळघर

खरीप हंगामासाठी यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेला केंद्र व राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. जावळी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी शेखर गुजर यांनी केले आहे.

  नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱयांना या योजनेमुळे विमा संरक्षण मिळते तसेच इतरही लाभ  होतात. शेतकऱयांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्र, तांत्रिक ज्ञान व साधनसामुग्री वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱयांना बंधनकारक व बिगर कर्जदारांना ऐच्छिक अशा स्वरुपाची  आहे. विम्याचा दर हा खरीप हंगामासाठी 2 टक्के आहे. तर रब्बी हंगामासाठी तो 1.5 टक्के आहे. तसेच नगदी पिकासाठी 5 टक्के असा दर  निश्चित करण्यात आला आहे.

  पीकनिहाय भरावयाची विमा संरक्षित रक्कम ही नाममात्र असून ती भात पिकासाठी 780, खरीप ज्वारीसाठी 480, नाचणीसाठी 400 रूपये, तर भुईमूगासाठी 600 रूपये प्रति हेक्टर इतकी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.