|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मुंबई विद्यापीठाच्या 153 परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या 153 परीक्षांचे निकाल जाहीर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. मात्र आज शेवटचा दिवस असूनही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामध्ये समाधानाची बाब इतकीच की विद्यापीठाकडून 153 पारिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.

कला शाखेच्या 78, तंत्रज्ञान 48, विज्ञान10, वाणिज्य 7 आणि व्यवस्थापन शाखेच्या 10 परिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच 90 टक्के उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्याचा दावाही विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून 10 परिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले हेते. पदवी परिक्षांना 45 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर न करणाऱया विद्यापीठाची 4 जुलै रोजी राज्यपालांनी चांगलीच कानउघाडणी केली होती. विद्यापीठाचे सर्व निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा, असे आदेश त्यांनी कुलगुरूंना दिले होते. त्या आदेशानंतर खडबडून जाग्या झालेल्या विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाकडे मुल्यांकनाच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर 24 ते 27 जुलैच्या काळात अध्यापनाचे काम बंद करून 3 हजार 98 प्राध्यापकांना पूर्णवेळ मूल्यांकनाच्या कामासाठी जुंपले. यासाठी मुंबई विद्यापीठाची महाविद्यालये पूर्णवेळ मूल्यांकनांसाठी आधी चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत आणखी वाढवण्यात आली. पण तूरही लाखो उत्तलपत्रिकांची तपासणी करणे शक्य झाले नाही.पूर्णवेळ मुल्यांकनाची मुदत पुढे वाढवून 31 जुलैपर्यंत करण्यात आली. इतके करूनही जवळपास तीन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी राहिले होते. हे काम सोमवारपर्यंत होणे आवशक्यप्राय आहे, अशी कबुली विद्यापीठाकडूनच देण्यात आली होती.

Related posts: