|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गुरे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या टेंपो चालकास अटक

गुरे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या टेंपो चालकास अटक 

वार्ताहर/ लोणंद

येथील शिरवळ रोडवरून आयशर टेंपोतून 12 गुरे अवैद्य वाहतूक करुन कत्तलखान्यात घेऊन चाललेल्या टेंपो चालक हणमंत आबाजी सोनवलकर याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. 

  याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास लोणंदच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ टेम्पो चालक हणमंत सोनवलकर (वय. 42) रा. भाडळी ता. फलटण हा त्याच्या ताब्यातील आयशर टेंपो शिरवळकडून लोणंद मार्गे येत असताना शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ही गुरे भरलेला टेंपो बघून लोणंद पोलिसांना कळवले  असता पोलीस हवालदार विशाल वाघमारे व सागर बदडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा टेंपो अडवला. त्या टेंपोमध्ये लहान-मोठी 12 गुरे होती, त्यात एक म्हैस व 9 तांबडय़ा-पांढऱया गायी, एक खोंड अशी 12 जनावरे त्यामध्ये भरण्यात आली होती. ही गुरे बेकायदा बिगर परवाना भरुन कत्तल करण्यासाठी घेऊन चाललेल्या सोनवलकरला पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत लोणंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यशवंत महामुलकर करीत आहेत.

Related posts: