|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तालुका पंचायतची 9 रोजी सर्वसाधारण बैठक

तालुका पंचायतची 9 रोजी सर्वसाधारण बैठक 

प्रतिनिधी / बेळगाव

तालुका पंचायतची सर्वसाधारण सभा बुधवार दि. 9 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक शुक्रवार दि. 28 जुलै रोजी ठेवण्यात आली होती. मात्र  माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांच्या निधनामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली. 

9 रोजी होणाऱया बैठकीत मराठीतून कागदपत्रांसाठी मराठी सदस्य पुन्हा एकदा आक्रमक होणार असून अधिकारी आणि अध्यक्षांना धारेवर धरण्यात येणार असल्याचे समजते.

 याचबरोबर समांतर निधी वाटपाबाबतही अध्यक्षांना जाब विचारण्यात येणार आहे. जो निधी आला आहे तो समांतर वाटप करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.

स्टॅम्पडय़ूटी आणि सामान्य फंडातून काही रक्कम आपल्या अधिकाराखाली ठेवण्यातचा डाव अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी घातला आहे. याला सदस्यांचा विरोध होत आहे. दरम्यान यावेळी तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष फंडाबाबत कोणता निर्णय घेणार आहेत तसेच सदस्यांच्या आक्रमकपणामुळे निधी समांतर वितरण करणार आहेत का? याची बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्मयता नाकारता येणार नाही.