|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लक्ष्मीनगर-गणेशपूर येथे घरफोडी

लक्ष्मीनगर-गणेशपूर येथे घरफोडी 

प्रतिनिधी / बेळगाव

लक्ष्मीनगर, गणेशपूर येथील एका बंद घराची कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 97 हजार रुपयांचे साहित्य लांबविले आहे. शुक्रवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून या संबंधी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

शमसुद्दीन हुंडेकर यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शमसुद्दीन व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीनगर येथील आपल्या घराला कुलुप लावून सुभाषनगरला गेले होते. शुक्रवारी दुपारी ते आपल्या घरी परतले. त्यावेळी दरवाजा उघडा होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.

शमसुद्दीन यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी किराणा माल खरेदी करुन ठेवला होता. कपडे, एक तोळय़ाची चेन व 25 हजार रुपये असे एकूण 97 हजार रुपयांचे साहित्य लक्ष्मीनगर येथील घरात ठेवले होते. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts: