|Thursday, July 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल

इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

टेलिकॉम क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱया रिलायन्स जिओने नवा आयम गाठला आहे. देशात 4जी सेवा देणाऱया प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचे स्पीड सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

जिओचे जुलैमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65एमबीपीएस इतके असून ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील सर्वात मोठी दुरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’जाहीर केले आहे. त्यामध्ये जिओचे डाऊनलोड स्पीड 18.65 एमबीपीएस असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे एअरटेलचे सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 एमबीपीएस इतके नोंदवण्यात आले आहे. या यादीत व्होडोफोन 11.07एमबीपीएस स्पीडसह दुसऱया क्रमांकावर आहे तर 9.46 एमबीपीएस स्पीडसह आयडीया तिसऱया क्रमांकावर आहे. ट्रायच्या ‘माय स्पीड’या पोर्टलवर ग्राहक्यांच्या सूचनांच्या आधारे सरासरी डाऊनलोड स्पीड दाखवण्यात येत आहे. यापूर्वी जिओचे जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.80 एमबीपीएस तर मे मध्ये 19.12 एमबीपीएस इतके नोंदवण्यात आले होते. मे आणि जूनमध्येही व्होडोफाने, आयडीया आणि एअरटेल हे जिओच्या मागेच होते.