|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या पूर्वनियोजित : जेटली

केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या पूर्वनियोजित : जेटली 

ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :

केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. तसेच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आश्वासन जेटली यांनी दिले.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता राजेश याची मागील आठवडय़ात धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर यावर जेटली म्हणाले, वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जेटली यांनी केली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related posts: