|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रिन्स क्लबच्या गणेशोत्सवाची धुरा रणरागिणींकडे

प्रिन्स क्लबच्या गणेशोत्सवाची धुरा रणरागिणींकडे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब मंडळाने यंदाच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सरस्वती अजित पोवार यांची तर उपाध्यक्षपदी मानसी संयज पिसाळे यांची निवड करण्यात आली. मंडळाने पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देत यंदाच्या गणेशोत्सवाची धुरा रणरागिणींच्या हाती सोपवून, समाजापुढे एक वेगळ आदर्श ठेवला आहे. क्लबची सर्वसाधारण सभा अशोक पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी उत्सव समितीमध्ये पूर्णपणे महिलांची निवड करण्यात  आली.

  मंडळाची अन्य कार्यकारिणी अशी- सचिव- पूजा अजिंक्य जगताप, खजानिस- सिद्धी प्रदीप काटकर तर सदस्य म्हणून आरती बोरपाळकर, अरुणा खोत, अश्विनी जगताप, निता पोलादे, विद्या राऊत, स्वाती साबळे, तनुजा भोसले यांची निवड करण्यात आली. बैठकीस प्रदीप काटकर, रामभाऊ कोळेकर, अजित पोवार, अभिजीत पोवार, सतीश जोशी, सुभाष पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

   प्रिन्स क्लब तर्फे वर्षभर राबविल्या जाणाऱया विविध सामाजिक उपक्रमांमुळे हे मंडळ नेहमी चर्चेत असते. तसेच 1977 पासून समाजा प्रबोधनाचे व्यासपीठ मानून गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. पारंपारिक वाद्यांचा वापर,  गणेशमुर्ती दान उपक्रम, लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा, पान-सुपारी, हळदी – कुंक आदी कार्यक्रम क्लबच्यावतीने प्रतिवर्षी राबविले जातात. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात मंडळाच्यावतीने कोणता देखवा साकारला जाणार याची उत्कंठा गणेश भक्तांना लागून राहिलेली असते. टाकावू वस्तूंपासून दरवर्षी कमी खर्चामध्ये देखव्याची उभारणी केली जाते. तसेच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम व सणही साजरे केले जातात. मार्गदर्शन शिबिरे, सहलींचे आयोजन, वृत्तपत्रांचे वाचनालय आणि महिला व मुलांना बचतीची सवय लागावी याकरीता मंडळातर्फे मंगलमुर्ती भिशी ही सुरु करण्यात आली आहे. अशाप्रकाच्या विविध उपक्रमांद्वारे मंडळाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे.

Related posts: