|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » अर्सेनलकडून चेल्सी पराभूत

अर्सेनलकडून चेल्सी पराभूत 

वृत्तसंस्था/ विम्बले

रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात  ऑलिव्हर गिरॉडच्या स्पॉट कीकवरील गोलाच्या जोरावर अर्सेनलने चेल्सीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 अशा गोलफरकाने पराभव करून कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धा जिंकली.

अर्सेनलने प्रिमियर लीग आणि एफए चषक विजेत्या चेल्सी संघाला निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत 1-1 असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्सेनल संघातील फ्रान्सचा फुटबॉलपटू गिरॉडने स्पॉट कीकवर गोल नोंदविला तर चेल्सीतर्फे मोराटा आणि कोर्टियोस यांचे फटके अर्सेनलच्या गोलरक्षकाने अडविल्याने चेल्सीला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात 46 व्या मिनिटाला व्हिक्टर मोझेसने चेल्सीचे खाते उघडले. 82 व्या मिनिटाला बदली खेळाडू कॅलेसिनेकने अर्सेनलला बरोबरी साधून दिली होती. चेल्सी या स्पर्धेतील विद्यमान विजेता होता.