|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव, गोव्यातील जोडगोळीला हुबळीत अटक

बेळगाव, गोव्यातील जोडगोळीला हुबळीत अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

दोघा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करुन हुबळी उपनगर पोलिसांनी 10 घरफोडय़ांचा तपास लावला आहे. त्यांच्या जवळून 23 लाख 29 हजार 600 रुपये किमतीचे 832.78 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक पिस्तूल असे एकूण 24 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांमध्ये एकटा बेळगावचा तर दुसरा गोव्याचा आहे.

प्रकाश उर्व पक्मया विनायक पाटील (वय 32, मूळचा रा. शहापूर, बेळगाव, सध्या रा. सत्तरी-गोवा), रवी रुपचंद धनराज (वय 31, रा. विठ्ठल मंदिरजवळ, सांखळी-गोवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार तंगराज शल्वराज आचार्य (वय 32, रा. म्हापसा गोवा) हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या जोडगोळीने हुबळी, धारवाड, कारवार, बेळगाव जिह्यात चोऱया केल्याची कबुली दिली आहे.

उपनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मुत्तान्ना सरवगोळ, पोलीस निरीक्षक एस. एस. हिरेमठ, भरत एस. आर., प्रभू सुरीन, शिवप्रकाश नायक व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटावर आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटकात 32 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. प्रकाश उर्फ पक्मया पाटील याला यापूर्वी बेळगाव ग्रामीण पोलिसांनीही अटक केली होती. जामीनवर सुटका झाल्यानंतर तो पुन्हा चोऱया, घरफोडय़ा करतो.

प्रकाश हा व्यवसायाने वाहन चालक आहे. तर रवी हा ट्रकवर हमाली करतो. सध्या फरारी असलेला तंगराज हा सेंट्रींगचे काम करतो. या जोडगोळीकडून 832.87 ग्रॅम सोने, 1060 ग्रॅम चांदी, एक स्टील कोटेड पिस्तुल, तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यल्लापूर, मुंदगोड, हुबळी, हल्याळ व शिग्गांव येथे एकूण 10 घरफोडय़ा केल्याची कबुली या जोडगोळीने दिली आहे.

त्यांच्या जवळून जीए 04 कें 9516 क्रमांकाची एक पल्सर मोटार सायकल, चार मोबाईल संच, चोऱया, घरफोडय़ांसाठी वापरण्यात येत असलेली अवजारे जप्त करण्यात आली आहेत. प्रकाश पाटील हा आंतरराज्य गुन्हेगार असून यापूर्वी त्याने बेळगाव परिसरातही धुमाकूळ घातला होता. सध्या गोव्यात वास्तव्य करणाऱया प्रकाशने गोवा आणि चंदगड तालुक्मयातही चोऱया केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रकाश व त्याचे साथीदार पोलिसांना चकवा देत होते.

32 हून अधिक गुन्हे

या त्रिकुटाने महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात 32 हून अधिक गुन्हे केले आहेत. शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, कॅम्प, खडेबाजार, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1, संकेश्वर, कारवार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 2, हुक्केरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 4, हल्ल्याळ व यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 असे एकूण 16 गुन्हे केले आहेत. एका चंदगड तालुक्मयात त्यांनी 10 घरफोडय़ा केल्या आहेत.

Related posts: