|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बायकोला पिक्चर दाखवत नाही तो झिरो पेंन्डसी काय ठेवणार

बायकोला पिक्चर दाखवत नाही तो झिरो पेंन्डसी काय ठेवणार 

प्रतिनिधी /सातारा :

‘झिरो पेंन्डसी’ ही संकल्पना केवळ शासकिय कामांसाठीच आहे, असे नव्हे. आपल्या दैनंदिन जीवनातही याची अंमलबजावणी व्हायला हवी. जो आपल्या बायका पोरांना पिक्चर दाखवत नाही, तो शासकिय कार्यालयात काय झिरो पेंन्डसी ठेवणार? अशा हलक्या फुलक्या शब्दांत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कर्मचारी व अधिकाऱयांना तणावमुक्त कामांचा गुरूमंत्र दिला.

जिल्हा बँक सभागृहात आयोजित या व्याख्यानाला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषद सीईओ राजेश देशमुख, पत्रकार धर्मेंद्र पवार यांची उपस्थिती होती.

शासकिय कार्यालयांमध्ये मुळात ‘गाढवाच्या मागे व साहेबाच्या पुढे उभे राहु नये’ या न्यायाने काम चालते हे जगजाहीर आहे. आपला साहेब हा आपल्या चुकांवर बोटं ठेऊन आपल्याला शिव्या घालण्यासाठीच जन्माला आल्याची अनेकांनी खुणगाठ बांधुन घेतलेली असते. परंतु गुरूवारी सभागृहातला माहोल काही वेगळाच होता. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना अपेक्षित असलेल्या गतिमान प्रशासनाचे मुळ कशात असेल तर ते कामाच्या स्थुलतेवर आणि स्थुलता किंवा सुज कमी करायची असेल तर झिरो पेंन्डसीशिवाय पर्याय नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱयांना, अधिकाऱयांना अगदी त्यांच्या टेबलावर बसुन मैत्रीच्या भाषेत सांगत असल्याप्रमाणे दळवीसाहेब सांगत होते.

ते म्हणाले, झिरो पेंन्डसी म्हणजेच फॉलोअपरहित प्रशासन असायला पाहिजे. कोणत्याही कामाला एक वेग असतो. त्याच वेगात काम झाले पाहिजे. एक कागद म्हणजे एक माणुस आहे हे लक्षात ठेवा. टेबलावर आलेला कागद त्याच क्षणी आपले काम करून पुढे गेला पाहिजे. त्याचा पुन्हा फॉलोअप घेण्याची वेळ आली नाही पाहिजे. आपल्याला कामाची विभागणी करा. त्यांचे वर्गवारी तुमच्याकडे असली पाहिजे. तुमच्या समोर आलेल्या माणसाचे सर्वव्यापी समाधान झालेच पाहिजे. समोरच्या व्यक्तिला उडवून लावल्याचा प्रकार घडणे हा आपला, आपल्या कामाचा व प्रशासनाचा फोलपणा आहे. झिरो पेंन्डसी म्हणजे आनंददायी प्रशासन आहे, हेही लक्षात घ्या. जेंव्हा तुमच्या टेबलावर कोणतेच काम पेंन्डीग नाही तेंव्हा तुम्ही सर्वजणच समोरच्याला सन्मान देण्यासाठी मोकळे असाल. समोरच्या व्यक्तीवर जो त्रागा होतो तो तुमच्या कामाच्या ताणामुळे. म्हणुनच तुमची टेबल-खुर्ची ही झिरो पेंन्डसीमध्ये असेल तेंव्हा तुम्ही आनंदी असाल व समोरच्यालाही आनंद द्याल. ही संकल्पना सर्वस्पर्शी आहे.

Related posts: