|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्टेजच्या कठडय़ावरून पडल्याने 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू

स्टेजच्या कठडय़ावरून पडल्याने 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू 

सरवडे :

येथील चिन्मय निखिल वाईंगडे या 6 वर्षीय बालकाचा सार्वजनिक मंडळाच्या स्टेजवर खेळताना कठडय़ावरून पडून डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला.  ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. चिन्मयचे वडील भारतीय सैन्यात असल्याने ते गुरूवारी गावी आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सरवडे गावातील मोरे गल्लीत हनुमान तालीम मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्टेज उभारले आहे. या स्टेजवर बुधवारी सायंकाळी 5 वाजता चिन्मय हा गल्लीतील बालकांसमवेत खेळत होता. खेळत असताना त्याचा अचानक पाय घसरल्याने तो स्टेजवरून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला उपचारासाठी तात्काळ  मुरगुड येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु डोक्याला जबर मार बसल्याने उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मयत चिन्मयचे वडील निखिल वाईंगडे हे भारतीय सैन्य दलात पंजाब येथे सेवेत आहेत. चार दिवसापूर्वीच सुट्टी संपवून ते गावाहून पंजाबला गेले होते. गुरुवारी दुपारी चिन्मयचे वडील आल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील ,बहिण, आजी असा परिवार आहे.

Related posts: