|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » डोकलाम वाद : सीमेवरील गावे रिकामी करण्यास भारतीय सैन्याचा नकार

डोकलाम वाद : सीमेवरील गावे रिकामी करण्यास भारतीय सैन्याचा नकार 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

भारत व चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून डोकलामवरून वाद सुरू आहेत. डोकलाम संघर्षाग्नवरून सीमेवर तणाव निर्माण झाल्याने भारताने परिसरातील गावे रिकामी करण्यात सुरूवात केल्याची माहिती समोर आली, मात्र गुरूवारी भारतीय सैन्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. असे काही घडले नसल्याचे सैन्याने सांगितले.

चीनच्या पीपल्यस लिबरेशन आर्मीकडून तिबेटमध्ये सैनिक, तोफखान्यांशिवाय एअर डिफेन्स युनिटमध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात नियंत्रण रेषेजवळ चीनकडून सैन्य – शस्त्रास्त्र तैनात होत नसल्याचे म्हटले जात आहे. शिवाय अशी कोणतीही घटना नजरेस पडलेली नाही, ज्यामुळे भारतीय सुरक्षा दलांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.