|Sunday, July 22, 2018
You are here: Home » मनोरंजन » अक्षयच्या ‘टायलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

अक्षयच्या ‘टायलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई 

ऑनलाइन टीम / मुंबई :

अभिनेता अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा अक्षय कुमारचाहा या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20कोटी रूपयांची कमाई केली होती.मात्र टॉयलेट एक प्रेम कथा हा समाजिक विषयावरील सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

 

Related posts: