|Saturday, August 12, 2017
You are here: Home » विशेष वृत्त » 6 चेंडूत 6 आऊट, 13 वर्षीय मुलाचा विश्वविक्रम6 चेंडूत 6 आऊट, 13 वर्षीय मुलाचा विश्वविक्रम 

ऑनलाइन टीम / लंडन :

सह चेंडूत सहा आऊट घेण्याचा विक्रम इंग्लंडमधील 13 वर्षीय ल्यूक रॉबिन्सनने केला आहे. त्याने सहाही फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे. त्यामुळे सहा बॉलमध्ये सहा क्लीन बोल्ड करण्याचा देखील विक्रम त्याने केला आहे. ं

ल्यूकने फिलाडेलफिया क्रिकेट क्लबकडून खेळताना हा विश्वविक्रम रचला आहे. त्याच्या या कामगिरीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत ल्यूकने हा विक्रम रचला. ल्यूक ही ‘ड्रीम ओव्हर’टाकण्यासाठी आला तेव्हा त्याचे वडील स्टीफन रॉबिन्स हे पंच म्हणून समोर उभे होते. तर त्याचा भाऊ मॅथ्यू देखील मैदानाताच क्षेत्ररक्षण करत होता. तर ल्यूकची आई हेलेन ही या सामन्यात स्कोररची भूमिका बजावत होती.तर ल्यूकचे आजोबा ग्लेक हे प्रेक्षकात बसून त्याचा सामना पाहत होते. ल्यूकचा या अनोख्या विक्रमानंतर बोलताना त्याच्या वडिल म्हणाले, “मी मागील 30 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. मी देखील एकदा हॅटट्रीक घेतली आहे.पण ल्यूकने केलेला हा विक्रम आजवर तरी मी ऐकला नाही. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’’

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!