|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘स्वाईन फ्लू’ च्या रूग्णात वाढ

‘स्वाईन फ्लू’ च्या रूग्णात वाढ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

=कोल्हापूर जिल्हय़ातील ‘स्वाईन फ्लू’ च्या रूग्णात शनिवारी 6 ने वाढ झाली. यामुळे  संशयितांची संख्या 246 वर पोहचली आहे. यापैकी 110 रूग्ण पॉ†िझटिव्ह आढळले आहेत. तर आजपर्यंत स्वाईन फ्लूने 20 जणांचा बळी घेतला आहे.

शनिवारी वाढलेल्या 6 स्वाईन फ्लू संशयित रूग्णांपैकी 4 रूग्ण पॉ†िझटिव्ह आढळले आहेत. विविध खासगी व शासकीय आठ हॉस्पिटलमध्ये एकूण 5 संशयित तर 24 पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. हॉस्पिटलचे नाव व स्वाईन फ्लू उपचारासाठी दाखल झालेले अनुक्रमे संशयित व पॉझिटिव्ह रूग्ण संख्या पुढीलप्रमाणे : ऍपल हॉस्पिटल (0 व 7), ऍस्टर आधार हॉस्पिटल (3 व 8), सीपीआर (1 व 3), महालक्ष्मी हॉस्पिटल (0 व 1), डायमंड हॉस्पिटल (1 व 1), डी.वाय.पाटील हॉस्पिटल (0 व 1), सिध्दीविनायक हॉस्पिटल (0 व 2), महावीर हॉस्पिटल (0 व 1).

 

Related posts: