|Sunday, August 13, 2017
You are here: Home » Top News » काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात अकोल्यातील जवान शहीदकाश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात अकोल्यातील जवान शहीद 

ऑनलाईन टीम / काश्मीर :

जम्मू-काश्मीरातील शोपिया जिह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करातील जवान यांच्यात झालेल्या चकमकीत सुमेध गवई या जवानाला वीरमरण आले. गवई हे महाराष्ट्रातील अकोला येथील वीरपुत्र असल्याची माहिती मिळत आहे.

शोपिया जिह्यातील अवनीरा गावात काल (शनिवारी) रात्री दहशतवादी आणि भारतीय लष्करातील जवानांमध्ये चकमक झाली. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रत्युत्तरादरम्यान गवई हे शहीद झाले असून, एका कॅप्टनसह तीन जवानही या चकमकीत जखमी झाले आहेत. दरम्यान, गवई यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!