|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » अपराध मीच केला नाटकाचा रौप्य महोत्सव

अपराध मीच केला नाटकाचा रौप्य महोत्सव 

रसिकांच्या पाठिंब्याने अजरामर झालेलं व रंगभूमीचा एक काळ गाजवणारं ‘अपराध मीच केला’ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात आणण्याचं धाडस निर्माते किशोर सावंत व विवेक नाईक यांनी केलं. किवि प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून रंगभूमीवर आलेलं नव्या संचातलं हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं असून शुक्रवारी 18 ऑगस्टला रात्री 8.30 वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गफहात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.

नाटकाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून याचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते किशोर सावंत यांनी व्यक्त केला. नाटकाचे दिग्दर्शन विजय गोखले यांनी केले असून रमेश भाटकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, किशोर सावंत, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, यश जोशी (बालकलाकार), सुमंत शिर्सेकर, निशा परुळेकर, प्रियंका कासले यांच्या भूमिका आहेत.

Related posts: