|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

गणेशोत्सवाबाबत महत्त्वाच्या बाबी (दुसरा भाग)

बुध. दि. 16-09- 2017 New

ज्यांच्या जन्मकुंडलीत मंगळ बिघडलेला आहे, लग्नात अडचणी येत असतील, वास्तू होत नसेल अशांनी तरी गणेश आराधना अवश्य करावी. गणपतीची मूर्ती केव्हा आणायची त्यासंदर्भात शुभ अशुभ काळ वगैरे प्रश्न निर्माण होतात. जोपर्यंत चतुर्थी तिथी आहे, तोपर्यंत केव्हाही मूर्ती आणून तिची पूजा करता येते. घरात पूजली जाणारी मातीची मूर्ती 9 इंच किंवा हाताच्या वितीएवढी असावी, त्यापेक्षा मोठय़ा मूर्ती शक्मयतो आणू नयेत. पूजा करताना त्रास होऊ नये तसेच फार मोठय़ा मूर्ती असतील तर अडचण अथवा अवयव वगैरे दुखावले जाण्याची शक्मयता असते, त्यासाठी हा नियम असू शकेल. मूर्ती दरवषी त्याच आकाराची आणावी. काहीजण अधिक पैसे घालून दरवषी मूर्तीची उंची वाढवितात हे योग्य नाही. मूर्ती लहान अथवा मोठी पूजली तरी फळ तेच मिळणार हे लोकांच्या लक्षात येत नाही. गणपती किती दिवसाचा पूजावा अशी विचारणाही अनेकजण करतात. पूर्वीच्या काळी घरातच मातीचा गणपती बसवून त्याची विधीवत पूजा करून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करीत असत. दीड, पाच अथवा सात किंवा 10 दिवसाची प्रथा ही हौसेखातर असते. गणपती कितीही दिवस ठेवला तरी त्यात काही फरक पडत नाही.  सोयरसुतक अथवा इतर कारणामुळे चतुर्थीला गणपती आणता येत नाही. अशावेळी इतर दिवशी आणल्यास चालेल का असा प्रश्न अनेकजण विचारतात. गणेश चतुर्थीला महत्त्व आहे. त्यामुळे तो दिवस चुकला तर नंतर गणपती आणू नये. चतुर्थीचे महत्त्व इतर तिथीला येत नाही. घरात करणारे कुणी नसतात. मासिक पाळी वगैरे अडचणी, नोकरी, व्यवसाय व तत्सम  कारणे असता काय करावे असा संभ्रम निर्माण होतो. अशावेळी घरी गणपती न बसविता सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसादासाठी फळफळावळे द्यावीत, पैसे वगैरे दिल्यास त्याचा दुरुपयोगच अधिक होत असल्याचे दिसून येते. सार्वजनिक गणपतींची रोजच्या रोज पूजा होत असल्याने त्याचाही लाभ होत असतो. गणपती मूर्ती आणताना क्वचित तडे जातात. पूजा करतानाही अशा घटना घडतात. अशावेळी काही जण भयानक भीती घालतात, मोठमोठय़ा शांती करण्याचा सल्ला देतात, त्यामुळे घाबरून जाऊ नये, जर चतुर्थी दिवशीच असा प्रकार घडला तर ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी व दुसरी आणून तिची पूजा करावी. गणेशाचे कोणतेही स्तोत्र अथवा मंत्र म्हणून त्याची करुणा भाकावी. सर्व काही चांगले होईल. इतर दिवशी मूर्ती भंगल्यास गणेशाची माफी मागून तिचे विसर्जन करावे पण नव्याने गणपती आणू नये. नोकरी व्यवसाय अथवा इतर कारणाने गणपती बसविणे जमत नाही, अशावेळी काहीही विचार न करता ती प्रथा बंद करावी. तुम्ही मूर्ती आणलात अथवा न आणलात गणपतीला काहीही फरक पडत नाही, पण घरात मात्र गणपती स्तोत्राचे वाचन सुरू ठेवावे. गणपती मूर्ती देवतेच्या रुपातच बसवावी. क्रिकेटर वा तत्सम नको त्या रुपात मूर्ती असू नये, अथवा व्यक्तीमहात्म्य पूजेचा दोष लागतो. गणपती म्हणजे मुळातच मांगल्याची देवता आहे. त्यामुळे गणपती आणून तिचे विसर्जन करीपर्यंत त्याच्या पावित्र्याला कोठेही धक्का लागणार नाही. याची दक्षता घ्यावी.गणपती म्हणजे चेष्टा नव्हे हे लक्षात ठेवावे.

मेष

21 ची सोमवती अमावास्या चतुर्थस्थानी होत आहे. व्याघ्रमुखी घर किंवा वास्तुदोष असेल तर ते या दिवशी निवारण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती भक्कम राहील. रवि, शनि, केंद्रयोगामुळे अचानक काही अडचणी उदभवतील. भांडणतंटे, वादावादी, मध्यस्थी यापासून दूर राहिलेले चांगले. चैन व मौजमजेसाठी प्रवास घडतील. काही न ठरवता केलेल्या गोष्टी झटकन होऊन जातील.


वृषभ

सोमवती अमावास्या पराक्रमात होत असून धाडसाने जे काम कराल ते यशस्वी होईल. आर्थिक समस्या मिटतील. वास्तू खरेदी करणार असाल तर ती बाधिक नसल्याची खात्री करून घ्या. संततीची काळजी असेल तर ती मिटेल. व्यावसायिक सुधारणा दिसून येतील. शिक्षणात उत्तम. रवीचे भ्रमण अनेक बाबतीत लाभदायक आहे.


मिथुन

रवि, बुध, राहूचे भ्रमण तुमचा उत्साह वाढवेल. कमाईच्या अनेक संधी उपलब्ध होतील. हर्षल, शुक्राच्या लाभयोगामुळे काही नव्या ओळखी अत्यंत लाभदायक ठरतील. खरेदी विक्रीत उत्तम यश. कौटुंबिक जीवनातील संघर्ष कमी होईल. सांसर्गिक रोग व नेत्रविकार यापासून जपा. वाहन घसरणे, बेक फेल वैगेरेची शक्मयता दक्षता घ्या.


कर्क

सोमवती अमावास्येवर होणारे सूर्यग्रहण तुमच्या राशीत होत आहे. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. धोकादायक जोखीम स्वीकारणे शक्मयतो टाळा. कोणतेही काम साधे नसते याचा अनुभव या आठवडय़ात येईल. शैक्षणिक बाबतीत काही अडचणी उद्भवतील. वरि÷ांच्या नाराजीबद्दल नोकरी व्यवसायात मन लागणार नाही. एखादे नको असलेले काम करावे लागेल.


सिंह

सूर्यग्रहण काही बाबतीत शुभ व काही बाबतीत अनिष्ट ठरेल. घरातील पूर्वीचे दोष त्यादिवशी दैवी आराधनेने कमी करू शकाल. राशीस्वामी बलवान आहे. मनात जे आणाल ते जिद्दीने पूर्ण करून दाखवाल. कौटुंबिक सुख समाधान वाढेल. पैसा बऱयापैकी मिळाला तरच खर्चाचे प्रमाण वाढत राहील. एखाद्या यशस्वी व कार्यक्षमता  उत्तम असलेल्या व्यक्तींची भेट व त्यापासून फायदा होईल.


कन्या

सूर्यग्रहण शुभस्थानी होत असल्याने काही बाबतीत अतिशय सुरेख अनुभव येतील. हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होईल. शैक्षणिक क्षेत्र व सरकारी क्षेत्राशी संबंधित शनी बलहीन असला तरीही एखादे रेंगाळलेले काम पूर्ण होईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण. पूर्वार्जित इस्टेटीबाबतचा प्रश्न निकालात निघेल. अति दूरचे प्रवास मात्र टाळण्याचा प्रयत्न करा.


तुळ

दशमस्थानी सूर्यग्रहण नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतात. आर्थिक बाबतीत शुभ कलाटणी. कोणतेही काम कमी वेळेत व कमी खर्चात होईल. वडीलधाऱयांशी मतभेद व वाहन अपघात यापासून सावध राहणे आवश्यक. घरमालक व भाडेकरू यांच्यात विचित्र पेचप्रसंग शक्मयतो नमते घ्या.


वृश्चिक

भाग्यस्थानी होणारे सुर्यग्रहण काही दैवी अनुभव देण्याची शक्मयता आहे. अध्यात्मिक क्षेत्रात असाल तर उच्च प्रगती होईल. ष÷ाrतील शुक्र खर्चाचे नवे प्रसंग निर्माण करेल. आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम. नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नात यश. मानसिक ताणतणाव कमी होतील. कागदोपत्री व्यवहारातील अडचणी कोणाच्यातरी मध्यस्थीने मिटतील. मुलाबाळांच्या बाबतीत शुभकारक. गुरुचे भ्रमण अनेक बाबतीत लाभदायक.


धनु

सूर्यग्रहण अष्टमस्थानी होत असून हा योग चांगला नसतो. कोणतेही काम सावधगीरीने करा. मतभेदाचे प्रसंग टाळावेत. रवी, बुध, राहू, शुभ असल्याने भाग्योदयाच्या बाबतीत अनुकूल योग. कितीही अडचणी आल्या तरी निश्चित यश मिळवाल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. कर्ज प्रकरणापासून दूर राहिलेले चांगले. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. शक्मयतो गुंतवणूक टाळणे योग्य.


मकर

लाभातील शनिचा चांगला फायदा होईल. जागेसंदर्भातील समस्या असेल तर त्यावर मार्ग निघेल. सुर्यग्रहण सप्तम स्थानी होत आहे. पण त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. आरोग्याच्या बाबतीत औषधयोजना बदलावी लागेल. कामाचा व्याप वाढला तरी त्यातून बराच फायदा होईल. अष्टमातील रवी, बुध, राहूमुळे एखाद्याला संकटातून वाचवाल. राजकारणात असाल तर टिकाटिप्पणीला तोंड द्यावे लागेल.


कुंभ

दशमातील वक्री शनिमुळे नोकरी व्यवसायात किचकट समस्या निर्माण होतील. परंतु पुढील काळात त्यांचा चांगला परिणाम होईल. इतरांना जमणार नाही ते करून दाखवाल. विवाहाच्या रेंगाळलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू होतील. बंद पडण्याच्या स्थितीत असलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. कोर्ट प्रकरणात सरशी. गूढ वाङमय शिकण्याची इच्छा पूर्ण होईल. कामाचे योग्य नियोजन केल्यास कमी श्रमात यश मिळेल.


मीन

करेन ती पूर्व अशी ग्रहस्थिती आहे. शिस्तयोग, विचारसरणी, मानसिक प्रगल्भता व अविरत कष्ट यांच्या जोरावर मोठी कामे पार पडतील. नवी नोकरी नवा व्यवसाय सुरू करण्यास अनेकांचे सहकार्य लाभेल. परंतु धनस्थानी हर्षल असल्याने पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका.

Related posts: