|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रीडा क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

क्रीडा क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा 

वार्ताहर/औंध

 जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि नेतृत्वगुण वाढीस लागतात. जय पराजयाची पर्वा न करता  खेळात करीयर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळले पाहिजे. असे प्रतिपादन समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांनी केले.

  येथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज मध्ये तालुकास्तरीय बँडमिंटन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे, शंकरराव खैरमोडे, सहसचिव प्रा दिपक कर्पे, प्राचार्य डॉ संभाजीराव बामणे, एस बी घार्गे, प्रा प्रमोद राऊत, प्रा सुधाकर कुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

        सभापती संदीप मांडवे म्हणाले की कुस्ती मुळे माझ्या सारख्या खेळाडूला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणार्या खेळाडूंना नोकरीत संधी मिळाली आहे. मोबाईल वरील गेम आणि टी.व्ही वरील कार्यक्रम पाहण्यात अडकून पडणार्या मुलांनी मैदानावर गेले पाहिजे पालकांनी देखील मुलांना मैदानावर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

          यावेळी खेळाडू क्रीडा शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रा प्रमोद राऊत यांनी प्रास्ताविक केले प्रा संजय निकम यांनी आभार मानले.