|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अवयव दान ही काळाची गरज

अवयव दान ही काळाची गरज 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

आजच्या युगात अवयवदान करणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे गेल्या 34 वर्षांपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्त सीपीआरमध्ये मंडळाच्या वतीने रुग्णांना फळे वाटप उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

मंडळातर्फे प्रत्येक रूग्णांना पाच फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, सिव्हील सर्जन डॉ.एल.एस.पाटील, वैद्यकिय अधाक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे, रवी काळे यांनी मंडळाने यापुढेही सीपीआरमध्ये फळे वाटपाचा उपक्रम कायम सुरू ठेवावा, असे आवाहन केले. माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी, सीपीआर हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी मंडळ नेहमीच पुढाकार घेईल, असे सांगितले. सुहास भेंडे यांनी डॉ.रामानंद यांच्या आहवानानुसार कार्यकर्ते अवयवदान उपक्रमामध्ये सहभाग नोंदवतील, असे सांगितले. प्रास्ताविक प्रसाद वळंजू यांनी केले.

यावेळी वीरशैव बँकेचे चेअरमन व ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत स्वामी, जगन्नाथ लिधडे, महंमद पठाण, दिलीप खोत, वसंत राजे, पोपटराव मुसळे, पंडीत पोवार, यशवंत वळंजू, सुनील पोवार, गणेश वळंजू, रघुनाथ जगताप, बाळासाहेब भोसले, संतोष मुठेकर, विनोद घाटगे, प्रमोद सुतार आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.