|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 50 रूपयांची नवी नोट लवकरच चलनात

50 रूपयांची नवी नोट लवकरच चलनात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली  :

आरबीआयकडून 50 रूपयांच्या नव्या नोटाची घोषणा करण्यात आली असून लवकरच ही नोट चलनात येणार आहे. पन्नास रूपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळय़ा रंगाची असेल. सध्या चलनात पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.

काही दिवसांपासून 50 रूपयांच्या नव्या नोंटेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आरबीआयच्या घोषणेमुळे हे फोटो खरे असल्याचे समोर आले आहे. नोटेच्या मागच्या बाजुला रथासोबत हम्पीच्या मंदिराचे चित्र असेल.नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील.

पन्नसा रूपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळय़ा रंगाची असून मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र असेल. देवनागरीतही पन्नास लिहिलेले असेल. सिक्युरिटी थ्रेडवर भारत आणि आरबीआय असे लिहीलेले असेल. नोटेच्या उजव्या बाजुला अशोक स्तंभ असेल. सर्वात वर डाव्या बाजूला पॅनलवरील नंबर लहानपासून आकाराने मोठे होत जातील.