|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘तेजस एक्प्रेस’मध्ये मिळू लागले मोदक

‘तेजस एक्प्रेस’मध्ये मिळू लागले मोदक 

प्रतिनिधी /चिपळूण

गेल्यावर्षी मुंबईहून दिल्लीला जाणाऱया राजधानी एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव कालावधीत उकडीचे मोदक देण्याच्या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केल्यानंतर मंगळवारपासून गणेशोत्सवासाठी तेजस एक्स्प्रेसधून प्रवास करणाऱया प्रवाशांना रेल्वेकडून उकडीचे आणि तळलेले मोदक देण्यास प्रारंभ झाला आहे. गणेशोत्सव काळात ही ‘कॉप्लीमेंटरी’ प्रवाशांना मिळत असल्याने त्याचे स्वागत होत आहे.

देशात प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही ‘सेमी हायस्पीड’ वातानुकुलित रेल्वेगाडी गेल्या 21 मेपासून धावत आहे. स्वयंचलित दरवाजे, धावत्या गाडीत वायफाय इंटरनेट, मनोरंजनासाठी प्रत्येक आसनापुढे एलईडी क्रीन, प्रवाशांना ऑनबोर्ड उद्घोषणा, बटन दाबताच हजर होणारा कर्मचारी अशा विमानाच्या तेडीच्या सुविधा मुंबईतील सीएसटी ते गोव्यातील करमाळी स्थानकादरम्यान धावणाऱया या गाडीत असल्याने सर्वाचे लक्ष वेधत आहे.

असे असतानाच आता गणेशोत्सवात ही गाडी हाऊसफुल्ल धावत असल्याने या गाडीत प्रवाशांना मोफत मोदक पुरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू असून मुंबईकडून कोकणात जाताना नाष्टय़ाला उकडीचे आणि गोव्यावरून मुंबईला जाताना जेवणावेळी तळलेले मोदक दिले जाणार आहेत. दरम्यान, रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.

Related posts: