|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गर्भलिंग तपासणी करण्यासाठी नेण्यात आलेली गाडी जप्त

गर्भलिंग तपासणी करण्यासाठी नेण्यात आलेली गाडी जप्त 

प्रतिनिधी /नागठाणे :

अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा (काशीळ, ता.सातारा) येथील डॉ.सिकंदर आदम शेख याच्यासह (शाहूपुरी,ता सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.रात्री उशिरा या दोघांनाही अटक करण्यात आली.गुरुवारी या दोघांनाही पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  आज बोरगाव पोलिसांचे संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्याची झडती घेण्याचे काम चालू होते.दरम्यान,डॉ.सिकंदर शेख याने गर्भलिंग तपासणीसाठी वापरलेले सोनोग्राफी मशीनचाही शोध पोलीस घेत असून अद्याप ते पोलिसांना सापडले नसल्याचे समजते.याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत डॉ.अशोक पाटील याची रेनॉल्ड स्काला ही आलिशान चारचाकी जप्त केली आहे.या घटनेचा तपास सपोनि संतोष चौधरी करत आहेत.

 

 

 

 

 

Related posts: