|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संतुलित मांडणीमुळे ‘तरुण भारत’ वाचकांमध्ये लोकप्रिय

संतुलित मांडणीमुळे ‘तरुण भारत’ वाचकांमध्ये लोकप्रिय 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा आदी क्षेत्रातील वार्तांकन करताना ‘तरुण भारत’ने नेहमी वस्तुनिष्ठ, संतुलीत मांडणी करण्याची शैली जपली आहे. कोणताही डामडौल, बडेजाव न मारता समाजाचे प्रश्न मांडणाऱया ‘तरुण भारत’ने प्रामाणिकपणाच्या बळावर वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे बेळगावचा ‘तरुण भारत’ कोल्हापुरचा झाला आहे, अशा शब्दात पंचगंगा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी ‘तरुण भारत’च्या कार्याचा गौरव केला.

 ‘तरुण भारत’ आयोजित गणेशोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धेतील कूपन क्रमांक 3 मधील भाग्यवान विजेत्यांना मंगळवारी बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी कूपन क्रमांक 4 चीही सोडत (ड्रॉ) काढण्यात आली. यावेळी दीपक फडणीस  बोलत होते. येथील दसरा चौकातील ‘तरुण भारत’च्या कार्यालयामध्ये हा समारंभ झाला. यावेळी पोरे एज्युकेशन सोसायटीच्या मधुरा पोरे यांच्यासह 1 सप्टेंबरला प्रकाशित होणाऱया ‘बंदुक्या’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल चौधरी, निर्माता निलेश बोरसे, अभिनेता नामदेव मुरकुटे, मानसी देवराय आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘तरुण भारत’ने गणेशोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. अल्ट्राटेक सिमेंट या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. मंगळवारी झालेल्या समारंभात कूपन क्रमांक 3 चे विजेते स्वप्नाली सुरेश जगदाळे (पायमल वसाहत, कोल्हापूर), धोंडीराम उलपे (उत्तरेश्वरपेठ, कोल्हापूर), राजेंद्र उत्तम साळी (सानेगुरूजी वसाहत), श्रवन मोहन पोवार  (माळ गल्ली, कसबा बावडा), नेहा हेमंत डांगे (डांगे गल्ली, जुना बुधवारपेठ) या पाच विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात कूपन क्रमांक 4 चा ड्रॉ काढण्यात आला. यातील विजेत्यांना बुधवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱया समारंभात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना पंचगंगा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस म्हणाले, ‘तरुण भारत’ कोठेही बडेजाव न मारता सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम करीत आहे. दररोजच्या अंकामध्ये वेगवेगळे सदर असल्याने ‘तरुण भारत’ वृत्तपत्राबद्दल वाचकांना आपुलकी वाटते, असे सांगितले.

पोरे एज्युकेशन सोसायटीच्या मधुरा पोरे म्हणाल्या, ‘तरुण भारत’ने सुरू केलेल्या ‘खजाना’, ‘चॅम्पियन’, ‘स्कॉलरशिप मित्र’, आणि  ‘एसएससी मित्र’ पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती वाढते. ‘तरुण भारत’ चे स्तुत्य उपक्रम असल्याने मी गेल्या 12 वर्षापासून वाचक आहे.

मराठी चित्रपट ‘बंदुक्या’चे दिग्दर्शक राहुल चौधरी म्हणाले,  गणेशोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून वाचकांना ज्ञानाच्या शिदोरीबरोबर रोप देवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो, ही बाब कौतुकास्पद आहे. अभिनेता नामदेव मुरकुटे म्हणाले, ‘तरुण भारत’ गणेशोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषा टिकवण्याचे काम करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांच्या बुध्दीचा विकास होतो.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन पाटील यांनी केले. यावेळी ‘तरुण भारत’चे प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, ग्रामीण जाहीरात व्यवस्थापक आनंदा साजणे, वितरण व्यवस्थापक सचिन बरगे, निर्माता निलेश बोरसे, जाहिरात प्रतिनिधी सौरभ मुजूमदार, सदानंद पाठक, रणजित कणसे, उदय जाधव, प्रताप मेडशिंगे, उदय पाटील, दीपक घरपणकर, मयूर गिजवणेकर, प्रकाश केसरकर, शरद पाटील, महेश सिसाळ, निखिल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.