|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्ह्य़ात बकरी ईद निमित्त उत्साहाचे वातावरण

जिल्ह्य़ात बकरी ईद निमित्त उत्साहाचे वातावरण 

प्रतिनिधी/ सातारा

मुस्लिम सामाजाचा पवित्र समाजला जाणारा बकरी ईद सण शनिवारी, दि. 2 रोजी सर्वत्र साजरा होणार असून मुस्लिम बांधव सकाळी 8 वाजल्यापासून नमाज पठणाला सुरुवात करणार आहेत. नमाज पठणानंतर धर्मिक परंपरेनुसार बोकडाचा कुर्बानी दिली जाणार आहे. तसेच यावेळी एकमेकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात येते. या सणा निमित्त जिल्हय़ात  विविध ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अज्हा बकरी ईद हा सण उत्साहात साजरा होत असून सातारा शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पोवईनाका मस्जिद सकाळी 8.30, एस. टी. स्टॅण्ड मस्जिद सकाळी 8 वाजता, पोलीस हेडक्वार्टर मस्जिद सकाळी 8.30, शाही मस्जिद सकाळी 8.30, मर्कज (खड्डा मस्जिद) सकाळी 8.45 वाजता, पापाभाई कॉलनी मस्जिद सकाळी 9 वाजता, मदिना मस्जिद (शनिवार) सकाळी 8.30, मक्का मस्जिद (बुधवारा) सकाळी 9 वाजता, बेगम मस्जिद (माची पेठ) सकाळी 8.15 वाजता, मस्जिदे अक्सा (मंगळवारा) सकाळी 8.45 वाजता, सत्वशील नगर सकाळी 8.15 वाजता, चाँदतारा, कमाठीपुरा सकाळी 8.30 वाजता, हिरा फ्लोअर मिल (एल-15, एम. आय. डी. सी.) सकाळी 9.30 वाजता, इब्राहिमभाई जर्दा (जुनी एम. आय. डी. सी.) सकाळी 9.30 वाजता, डि. बी. शेख वखार (जुनी एम. आय. डी. सी.) सकाळी 8.30 वाजता, बिलाल (करंजे) सकाळी 8.30 वाजता, संगमनगर सकाळी 8.45 वाजता, पिरवाडी सकाळी 8.30 वाजता, कब्रस्तान ईदगह सकाळी 10 वाजता, सदरबझार ईदगाह सकाळी 10 वाजता, सदरबाझार मस्जिद सकाळी 10 वाजता, मदरसा एल. बी. एस. सकाळी 8.45 वाजता या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी वेळेवर उपस्थित राहावे. तसेच प्रत्येक मशिदीच्या परिसरात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी, सर्व बांधवांनी आपली वाहने पार्किंगमध्येच आणि मशिदीपासून 100 मीटर अंतरावर लावावीत व जिल्हा पोलीस दलास व प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष, मुस्लिम मायनॉरिटी कौन्सिल, सातारा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related posts: